Home रत्नागिरी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवासाद्वारे जनजागृती दापोली सायकलिंग क्लबचे अजय...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवासाद्वारे जनजागृती दापोली सायकलिंग क्लबचे अजय मोरे आणि सुरज भुवड यांचा उपक्रम

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0051.jpg

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवासाद्वारे जनजागृती दापोली सायकलिंग क्लबचे अजय मोरे आणि सुरज भुवड यांचा उपक्रम

दापोली/रत्नागिरी,(सुनील धावडे) : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते, वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत लोकं गावी पोहोचतात. दापोली सायकलिंग क्लबचे अजय मोरे आणि सूरज भुवड यांनी अंधेरी मुंबई ते दापोली असा २५० किमीचा प्रवास करण्यासाठी सायकलची निवड केली. या सायकल प्रवासात त्यांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव याबद्दल जनजागृती केली.

नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असलेल्या अजय मोरे आणि सूरज भुवड यांचे गाव दापोली तालुक्यातील लाडघर व आंबवली आहे. हा २५० किमीचा सायकल प्रवास त्यांनी बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग अंधेरी, पनवेल, खोपोली, पाली, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरु झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला. या खडतर सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पा गोष्टी झाल्या. पर्यावरण पूरक गणपती उत्सव हा संदेश घेऊन निघालेल्या त्यांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या त्यामुळे सर्व थकवा गायब झाला असे त्यांचे म्हणणे आहे.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात अजय आणि सूरज सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनले आहे, अनेक वर्षांपासून ते आजारी पडले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरुप झाला असे त्यांचे मत आहे. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी असे त्यांनी आवाहन केले आहे.

Previous articleकशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला ; चालक जखमी
Next articleलांजा-कनावजेवाडी रस्त्यावर आढळून आले खवले मांजर; तरुणांच्या सतर्कतेमुळे खवले मांजराचे वाचले प्राण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here