Home रत्नागिरी कशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला ; चालक जखमी

कशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला ; चालक जखमी

141

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0050.jpg

कशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला ; चालक जखमी                                                    रत्नागिरी,(सुनील धावडे)

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावाच्या हद्दीत ट्रक सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंध्र प्रदेशकडून रोहा दिशेने जाणारा ट्रक एपी/२१ टी वाय १४४९ चालक लक्ष्मी रेड्डी चेन्ना रेड्डी (वय ५५, रा. आंध्र प्रदेश) हा त्यांच्या ताब्यातील ट्रक क्लोरीन गॅस सिलिंडर घेऊन रोहा दिशेने जात होता. यावेळी कशेडी घाट उतरत असताना भोगाव गावच्या हद्दीत रस्ता खचलेल्या ठिकाणी ट्रक आला असता, ट्रक ब्रेक फेल झाल्याने ट्रक सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला.

या अपघातात ट्रक चालक लक्ष्मी रेड्डी चेंना रेड्डी यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, सहाय्यक फौजदार सुर्वे, हे. कॉ. साखरकर, दाभोलकर, पो. ना. माजळकर, गमरे, मृत्यू देवदूत उत्तेकर यांचे सहकारी यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.