Home अमरावती निवडणुकीसाठी आधीचे नको,नव्याने हवेस्वातंत्र्य बँक खाते: निवडणूक आयोगाने केले स्पष्ट; ८५ लाख...

निवडणुकीसाठी आधीचे नको,नव्याने हवेस्वातंत्र्य बँक खाते: निवडणूक आयोगाने केले स्पष्ट; ८५ लाख रुपयाची खर्चाचीढ मर्यादा.

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_191509.jpg

निवडणुकीसाठी आधीचे नको,नव्याने हवेस्वातंत्र्य बँक खाते: निवडणूक आयोगाने केले स्पष्ट; ८५ लाख रुपयाची खर्चाचीढ मर्यादा.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
आगामी लोकसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी स्वातंत्र्य बँक खाते उघडावे लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा कुटुंबातील इतर सदस्या सोबत असलेले इतर कोणतेही बँक खाते त्यासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक साठी प्रत्येक उमेदवाराला कमाल ८५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निकाल घोषित होईपर्यंत सर्व करता या मर्यादित पूर्ण केला जावा असे भारत निवडणूक आयोगाचे आहे. खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांना बंधनकारक करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत उमेदवाराला नामांकन अर्ज विकत घेणे त्यासाठीच्या पूरक कागदपत्राची झुळझुळ करण्यासाठी ठिकठिकाणी शुल्क अदा करणे, स्टॅम्प पेपरची खरेदी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्ता मंडळाचा चहा पाणी, सभा बैठकीचा खर्च, नेत्यांच्या दौऱ्याचा खर्च, मतमोजणी वेळी लागणारे मनुष्यबळ आधीसाठी रक्कम खर्च करावा लागतात. या सर्व रकमाचा एकाच जागी हिशोबसाबा म्हणून निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतःचे नावे किंवा त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या सोबत संयुक्त बँक खाते उघडता येईल. हे खाते किंवा लोकसभा निवडणूक कामासाठी काढलेले असावे. या खात्यामध्ये लोकसभा निवडणूक व्यतिरिक्त इतर कोणतेही व्याहार असू नयेत, असे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणूक आटोक्यानंतर त्याची वैद्यता संपुष्टात येईल या खात्यातील इतर कोणतेही संयुक्त बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. बँक खाते नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचा कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक आहे. दरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी असे नेमणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Previous articleदहशत निर्माण करणाऱ्या पाच गुंडांना एक वर्षासाठी करण्यात आले स्थानबद्ध
Next articleकुणालाही गावबंदी करता येणार नाही; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार : जिल्हाधिकारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here