Home जालना दहशत निर्माण करणाऱ्या पाच गुंडांना एक वर्षासाठी करण्यात आले स्थानबद्ध

दहशत निर्माण करणाऱ्या पाच गुंडांना एक वर्षासाठी करण्यात आले स्थानबद्ध

219

आशाताई बच्छाव

IMG_20240404_191204.jpg

दहशत निर्माण करणाऱ्या पाच गुंडांना एक वर्षासाठी करण्यात आले स्थानबद्ध
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 04/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यात नजीकच्या काळात लोकसभा निवडणुका तसेच महत्त्वाचे सन ऊत्सव साजरे होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये तसेच निवडणुका व सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे अभिलेखावरील सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची गुन्हे निहाय वेगवेगळी यादी तयार करणे तसेच त्यांच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करणे याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने आरोपींची गुन्हेनिहाय यादी तयार करण्यात आली असून आवश्यकतेप्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करणे चालू आहे.
जालना जिल्ह्यातील सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे गुन्हेगाराविरुद्ध सन 2024 मध्ये एकूण 6MPDA प्रस्ताव सादर करून एकूण 5 गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. त्यामध्ये पोलीस ठाणे हसणाबाद हद्दीतील गुन्हेगार नामे 1)गणेश संतुकाराव पुगळे वय 30 वर्ष रा. राजुर तालुका भोकरदन जिल्हा जालना,2) किरण कैलास पंडित वय 27 वर्ष राहणार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचे विरुद्ध गंभीर स्वरूपाची गुन्हे यामध्ये जबरी चोरी, खंडणी, गौण खनिज चोरी, चोरी, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, अवैध शस्त्र ताब्यात बाळगणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, धमकावणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कार्यवाही करून देखील त्यांचे गुन्हे करण्यात वाढ होत असल्याने पोलीस ठाणे असणाबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय आहिरे यांनी नमूद दोन्ही गुन्हेगाराविरुद्ध MPDA प्रस्ताव सादर केला होता.माननीय जिल्हादंडाधिकारी यांनी प्रस्तावास मान्यता देऊन सदर गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृह हरसुल छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केलेले त्यावरून नमूद दोन्ही गुन्हेगारांना दिनांक 4 /4 /2024 रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह हरसुल छत्रपती संभाजीनगर या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची गुन्हे निहाय यादी तयार करण्यात आली असून त्यांची विरुद्ध नजीकच्या काळात अशाच प्रकारच्या प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्री एफ. पी. फडे, स्थागुशाचे पोहेकाॅ फुलचंद हजारे, पोलीस ठाणे हसनाबाद पोलीस आमलदार एन.जी. खराट, एन.पी. चलावंडे, डी.पी. सोनुने पी.जी. बोर्डे यांनी कामगिरी पार पाडली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8483951442/9763966560

Previous articleसांगलीमध्ये लँड जिहाद चे प्रकरण उघडकीस
Next articleनिवडणुकीसाठी आधीचे नको,नव्याने हवेस्वातंत्र्य बँक खाते: निवडणूक आयोगाने केले स्पष्ट; ८५ लाख रुपयाची खर्चाचीढ मर्यादा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.