Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिक जिल्हा बँकेचा अजब कारभार; शेतकऱ्यांवर अन्याय, कर्जाबाबत अडवणूकीचे राजकारण..!!

नाशिक जिल्हा बँकेचा अजब कारभार; शेतकऱ्यांवर अन्याय, कर्जाबाबत अडवणूकीचे राजकारण..!!

145
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक जिल्हा बँकेचा अजब कारभार;
शेतकऱ्यांवर अन्याय, कर्जाबाबत अडवणूकीचे राजकारण..!!
( राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव- सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर येत असतानाच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून,शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी विविध कर्ज देण्याकामी बँकेने आडमुठे व अडवणूकीचे धोरण अंगीकारल्याने शेतकऱ्यावर पश्चात्तापाची वेळ येऊन ठेपली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्याचे बँक खात्यात पैसे असतानाही अडवणूकीचे धोरण अवलंबीत कर्जदार शेतकऱ्याकडून रोखीने कर्ज वसूली केली.तर शासनाने माफ केलेल्या कर्जाची पुर्तताही सदरच्या बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली नसल्याची तक्रार व-हाणे येथील शेतकरी व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पवार यांनी “युवा मराठा न्युज”शी बोलताना केली.
नोटबंदी पासुन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही डबघाईस गेल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.प्रत्यक्षात मात्र गावोगावी या बँकेला जोडल्या गेलेल्या विविध सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांनाच हि बँक कर्ज दैण्यास टाळाटाळ करुन अडवणूक करीत असल्याने शासनाच्या शेतकऱ्यासाठी असलेल्या योजना व झालेल्या घोषणा हा निव्वळ भुलभुलैय्याच असून,शेतकऱ्याची मात्र घोर फसवणूक सुरु असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यानी बोलून दाखविल्या आहेत.त्याशिवाय सदरच्या बँक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना रोखीने कर्ज भरा म्हणजे लगेचच शेतकऱ्यासाठी पीक कर्ज व इतर वाटप करायचे असल्याचे आमिषाचे गाजर दाखवून मात्र आज रोजी सदर बँकेकडून शेतकरी वर्गाची अडवणूक करताना ज्या गावातील सहकारी सोसायटीची किमान साठ टक्के वसूली असेल,त्याच गावात शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल,असा हिटलरशाही हुकूमशहा पध्दतीने बँक व्यवस्थापनाने काढलेला हा फतवा यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून,या बँकेवर शासनाचा काही अंकूश आहे किंवा नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.वास्तविक ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची अर्थवाहिनी म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितले जाते.ग्रामीण भागातील सतर ते ऐंशी टक्के शेतकऱ्याचे या बँकेत खाते असून आणि स्वतःच्या खात्यावर पैसे असतानाही या बँकेकडून मात्र शेतकऱ्यांना सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांचे हक्काचे पैसे न देता अडवणुक करून अक्षरशः लाचारासारखे हजार दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्याची या बँकेकडून बोळवण केली जात असल्याचे चित्र आहे,त्यामुळेच या बँक व्यवस्थापनावर शासनाने कठोरात कठोर कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Previous articleयंत्रणाच नसताना पुण्यातील रुग्णालय दवाखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण 🛑
Next articleखासदार साहेब डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नातून रेमेडी शिवर औषध उपलब्ध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here