Home विदर्भ सा. बुलढाणा बातमीपत्र च्या संपादकाला अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या...

सा. बुलढाणा बातमीपत्र च्या संपादकाला अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या जि.प. पाणी पुरवठा अभियंता व्हि. एम. चव्हाण ला पोलीसांचा वाचविण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल

60
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220402-061737_Facebook.jpg

सा. बुलढाणा बातमीपत्र च्या संपादकाला अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या जि.प. पाणी पुरवठा अभियंता व्हि. एम. चव्हाण ला पोलीसांचा वाचविण्याचा प्रयत्न
पोलीसांनी केला तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी संपादक
आकाश पाटील यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू
खामगांव ( युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्हा परिषद उपविभागीय पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचे वृत्त आपल्या साप्ताहिक बुलडाणा बातमीपत्र या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केल्याने चिडून जाऊन जि.प. च्या पाणी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अभियंत्याकडून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात सव्वा दोन महिन्यापूर्वी सदर वृत्तपत्राचे संपादकाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा करीता तक्रार केली होती परंतु पोलीसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करता अदलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे अखेर आज सोमवार दि. 11 एप्रिल पासून सा. बुलडाणा बातमीपत्र चे संपादक आकाश संतोष पाटील यांनी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आकाश पाटील यांनी दि. 25 जानेवारी 22 रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजना खामगाव यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचारा संदर्भात सा. बुलडाणा बातमीपत्र या ते संपादक असलेल्या वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित केले होते. यावरून कार्यालयातील भ्रष्टाचार जनतेसमोर येत असल्याने चिडून जाऊन पाणीपुरवठा अभियंता व्ही. एम. चव्हाण यांनी त्यांच्या पित्तु असलेला परंतु त्या विभागाशी कोणताही संबंध नसणार्‍या जाधव नामक इसमाचे भ्रमणध्वनी वरून अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.या संभाषणाची ऑडिओ क्लिप हि व्हायरल झाली होती. याप्रकरणी संपादकांनी खामगांव शहर पो. स्टे. येथे तक्रार देऊनही अभियंत्याविरुद्ध कुठलीही कारवाई खामगाव पोलीसांकडुन होत नव्हती म्हणून अखेर खामगाव शहर व तालुक्यातील पत्रकार यांना सोबत घेवून उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांना निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत आरोपी चव्हाण वर तात्काळ कार्यवाही व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सर्व पत्रकार व संपादक बांधवांचे उपस्थितीतीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी आज संध्याकाळ पर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करतो असे ठोस आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल होत नाही म्हणून संपादक पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. उपोषणाच्या एक दिवस आधी पोलीसांनी अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या व्हि. एम. चव्हाण वर सव्वा दोन महिन्यानंतर 504, 506 कलमा अंतर्गत अदखलपात्र थातुरमातुर गुन्हा दाखल करून पुन्हा एकदा आरोपी चव्हाण ला पोलीसांनी वाचवण्यासाठी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येताच या विरोधात संपादक आकाश पाटील यांनी आज सोमवार दि. 11 एप्रिल पासून उपविभागीय अधिकारी (महसुल) खामगाव कार्यालयासमोर आरोपी चव्हाण वर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई व्हावी म्हणून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
खामगाव पोलिसांनी केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदणी करण्यासारखा विक्रम
शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या अभियंता व्हि. एम. चव्हाण वर
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी रीतसर तक्रार दि. 14 /2/2022 रोजी आकाश पाटील यांनी शहर पोलिसांना देऊनही पोलीसांनी तक्रार अर्ज सव्वा दोन महिने चौकशी वर ठेवला. त्यानंतर काल तब्बल पोलिसांना अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी सव्वा दोन महिन्यांचा कालावधी लागला ते ही पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करता केवळ भा.द.वी. 504/506 नुसार अदखपात्र गुन्हा दि. 10/4/2022 रोजी दाखल केला खामगाव शहर पोलीसांनी सव्वा दोन महिने थातूरमातुर गुन्हा दाखल होण्यासाठी का घेतले हे न उलगडणारे कोडे आहे परंतु या निमित्ताने खामगाव पोलीसांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदणी सारखा विक्रम केला हे विशेष (चौकट)
उपोषण मंडपाला दिली अनेक मान्यवरांनी भेट
भ्रष्टाचाराचे बिंग फोडणार्‍या साप्ता. बुलडाणा बातमीपत्र चे संपादक आकाश संतोष पाटील यांना अश्लिल शिवीगाळ करणारा आणि जीवे मारण्याची धमकी देणारा अभियंता चव्हाण विरोधात सुरू केलेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खामगांव शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देवून त्यांची न्याय बाजू ऐकुन घेतली आणि आपला पाठिंबा दर्शविला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने, शिवसेनेेचे नेते अनिल अमलकार, मनसेचे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष शिवा लगर व रवी महाले यांचा समावेश होता. तसेच खामगांव शहरातील विविध दैनिक, सायं दैनिक, साप्ताहिकांचे संपादक आणि पत्रकार बांधवांनी भेट देवून आपला पाठिंबा दर्शविला. जोपर्यंत पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत चव्हाणवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून,महासंघाने संबधित उपोषणकर्त पत्रकार संपादक यांना जाहिर पाठींबा दिला आहे.तर भ्रष्टाचारी अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Previous articleसंग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडीत बंद
Next articleप्रहार जनशक्ती संघटना च्या वतीने पाणपोई माटरगांव जनसेवा हेच आमचे काम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here