Home बुलढाणा संग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडीत बंद

संग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडीत बंद

49
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0087.jpg

संग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडीत बंद
# संग्रामपूर तालुका बजरंग दल गो रक्षक च्या पाठीशी#
#पोलिसांच्या कारवाई चा निषेध#
#बजरंग दल व शेतकरी यांच्यावर लावलेले खोटे गुन्हे वापस घ्या#
#संग्रामपूर तालुका बंद चे आवाहन बजरंग दल व विहिप चे
# जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक याना दिले होते निवेदन#
संग्रामपूर ता प्र युवा मराठा न्युज नेटवर्क
अकोला जिल्ह्यातील दानापूर, सगोडा येथील बजरंग दल,शेतकरी यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ व हिवरखेड पोलीस स्टेशन च्या ठाणेदार यांनी सहकार्य करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्तेवर गुन्हा दाखल केला (चोर सोडून सण्यासाला फाशी) च्या निषेधार्थ दि 13 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडित बंद ठेवण्यात आला
सविस्तर असे की अकोला जिल्ह्यातील दाणापूर,सगोडा येथील शेतकरी याना दि 9 एप्रिल च्या मध्यरात्री 2 ते 3 च्या दरम्यान 40 गोवंश संशयस्पद आढळले असता त्या शेतकऱ्यांनी हिवरखेड येथील पोलीस स्टेशन ला फोन करून ही माहिती दिली व हिवरखेड येथील बजरंग दल चे रवी गावंडे यांनी ही पोलीस स्टेशन ला जाऊन माहिती दिली यांचे पोलीस स्टेशन ला सीसीटीव्ही फुटेज आहेत ते काढल्यास सर्व माहिती समोर येईल रवी गावंडे यांच्या माहिती वरून हिवरखेड पोलीस स्टेशन चे 3 कर्मचारी पोलीस ची गाडी घेऊन दानापूर शिवार मध्ये पोहोचले असता त्यांना तिथे 40 गोवंश दिसले व त्यांनी ते गोवंश पकडले मात्र गोवंश याना पोलीस स्टेशन मध्ये पायदळ न्यावे लागेल व आपल्या कडे एवढा पोलीस बंदोबस्त नाही म्हणून त्यांनी शेतकरी व बजरंग दल कार्यकत्याना विनंती केली की तुम्ही हे गोवंश घेऊन चला, पोलिसांना मदत म्हणून शेतकरी व बजरंग दल कार्यकर्त्यांनी हो म्हटले व हिवरखेड पोलीस स्टेशन च्या दिशेने निघालो व मागे मागे पोलीस स्टेशन ची गाडी ही होती मात्र हिवरखेड जवळील सोनवडी फाट्याजवळ काही समाज कंटक यांनी याना रोखले व सांगितले की ही गोवंश सोडून द्या त्या वर शेतकरी,बजरंग दल कार्यकर्ते व पोलीस यांनी सांगितले की आम्ही हे गोवंश पोलीस स्टेशन ला घेऊन जात आहे,थोडी बाचाबाची झाली असता काही समाज कंटक यांनी पोलीस व बजरंग दल कार्यकर्त्यावर हल्ला केला असता काही जण जखमी झाले या हल्या दरम्यान 36 गोवंश ते समाज कंटक घेऊन पसार झाले तर उर्वरित 4 गोवंश पोलीस स्टेशन ला नेले असता तेथील ठाणेदार यांनी शासकीय कामात अडथळा या कायद्या अंतर्गत बजरंग दल,शेतकरी यांच्या वर गुन्हे दाखल केले म्हणजेचं चोर सोडून सण्यासाला फाशी अशी युक्ती हिवरखेड ठाणेदार यांनी लावली ज्यांनी सहकार्यही गोरक्षक चे आणि कारवाई पण गोरक्षक वर या मुळे संपूर्ण बजरंग दल,विहिप,हिंदुवादि संघटना मध्ये ठाणेदार विरोधात रोष आहे या घटनेचा निषेध म्हणून संग्रामपूर तालुक्यातील बजरंग दल,विहिप यांच्या कडून दि 13 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुका बंद ची हाक दिली असता तालुक्यातील सर्वच गावात 100 टक्के कडकडीत बंद होता सर्व धर्मातील व्यापारिणी या बंद ला पाठिंबा देत आप आपली दुकाने बंद ठेवली या मध्ये संग्रामपूर, वरवाट बकाल,टूणकी,सोनाळा, वानखेड,पातुडाँ बु या सह सर्वच गावे बंद होती

अनेक प्रश्न उपस्थित
पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेलेली 36 गोवंश जप्त करण्यात आली का? त्या गोवंश चे काय झाले?गोरक्षकानी पोलिसांना मदत केल्यावरही त्याच्या वरच गुन्हे का दाखल झाले? मुख्य सूत्रधार आरोपीचे गोरक्षक नाव सांगतात तरीही त्याच्या वर कारवाई का नाही? ज्या 3 पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत गो तस्कर कडून आलेल्या जमावाचा सामना केला त्याची फिर्याद घेण्याऐवजी घटना स्थळी हजार नसलेल्या ठाणेदारांनी फिर्याद का दिली असावी?इतके गंभीर प्रकरण झाले असता ठाणेदार घटनास्थळी का गेले नाही?

चोर सोडून सण्यासाला फाशी
या समाज कंटक मध्ये सादिक नामक व्यक्ती तिथे हजर असताना त्याच्या वर कारवाई करण्यात आली नाही उलट गोरक्षक रवी गावंडे यांनी पोलिसांना संशयास्पद गोवंश बाबत माहिती दिली आणि पोलिसांनी त्यांनाच आरोपी बनविले. हिवरखेड ठाणेदारांनी जनावरांना जीवनदान देणाऱ्या शेतकरी,गोरक्षक यांच्या वर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हे दाखल करून त्यांना खोट्या गुन्ह्या अडकविल्या मुळे ठाणेदार यांच्या वर कारवाई करण्यात यावी या करीता संग्रामपूर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा तर तामगाव पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक याना बाजरग दल,विहिप,शेतकरी यांनी निवेदन दिले होते तर दि 13 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुका बंद ची हाक दिली असता दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण व्यापारी वर्गाने बंद ला पाठिंबा देत आप आपली दुकाने बंद ठेवली

तालुक्यातील व्यापारी चे आभार
संग्रामपूर तालुका दि 13 एप्रिल रोजी बजरंग दल,विहिप व शेतकरी यांच्या सांगण्या वरून सर्व व्यापारी वर्गाने आम्हाला 100 टक्के पाठिंबा दिला व असा कडकडीत बंद आज पर्यंत झाला नाही तो आमच्या मंगणी वरून बंद ठेवण्यात आल्या बांद्दल सर्व व्यापारी वर्गाचे बजरंग दल,विहिप कडून आभार व धन्यवाद करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here