आशाताई बच्छाव
लोकशाहीची आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच रूजविली-अॅड.मनोज संकाये
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: १४
सर्व विश्वामध्ये भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट ठरले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाच्या माध्यमातून खरी लोकशाही काय असते याचे मुर्तीमंत उदाहरण जगासमोर ठेवले, त्यांनीच आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती रूजविली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनोज संकाये यांनी केले. आज रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी भारतररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने अॅड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला आदर्श लोकशाहीचा मुलमंत्र दिला. त्यांना व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो असे अॅड.संकाये म्हणाले.
यावेळी राहुल कांदे, शिवा बडे, शिवाजी मुंंडे सर, काशिनाथ सरवदे, सुंदर आव्हाड, अॅड.बुध्दरत्न उजगरे, प्रशांत कदम, संजय पवार, बालाजी ठोके, गोविंद राठोड, संतोष कांबळे, राम गडदे यांच्यासह तमाम भीमसैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.






