Home बीड संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात...

संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

38
0

आशाताई बच्छाव

1000287755.jpg

संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: १४  शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित, संस्कार प्राथमिक शाळा,विद्यानगर विभागात विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलास तांदळे सर (अध्यक्ष,श्री पद्मावती शिक्षण संस्था) तर प्रमुख पाहुणे श्री. दीपक तांदळे सर (सचिव,श्री पद्मावती शिक्षण संस्था) व श्री. अमरशील गायकवाड सर (प्र. मुख्याध्यापक, संस्कार प्राथमिक शाळा) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. दीपक तांदळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, “सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे अनमोल रत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे नाव भिमराव असे ठेवण्यात आले. त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर असे होते. लहानपणाासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची खूप आवड होती. अनेक हाल अपेष्टा, आपमान सहन करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १८-१८ तास अभ्यास करत होते.त्यांनी अनेक विषयावर संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी अनेक विषयावरील पुस्तकांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये लेखन केले आहे.आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या आहेत. बॅरिस्टर बनून त्यांनी वंचितांना हक्क मिळवून दिला. समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. बाबासाहेबांनी आंदोलन करून चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सर्वांकरिता खुले केले. ही घटना चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते; तर घटना समितीमध्ये प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते . बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून घटनेचा मसुदा तयार केला. त्यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस मेहनत घेवून राज्यघटना तयार केली.संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ही घटना स्वीकारली व २६ जानेवारी १९५० पासून ही घटना आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली. भारतीय संविधानाची निर्मिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लोकशाहीचा मार्ग आपल्याला समतेवर आधारित जग निर्माण करण्याची प्रेरणा देतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यवंशी तर आभार श्री. शेप सर यांनी मानले शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here