• Home
  • 🛑 *छत्रपती संभाजी महाराजांना अखेरचे पाहणारा सरदेसाई यांचा वाडा….! कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी* 🛑

🛑 *छत्रपती संभाजी महाराजांना अखेरचे पाहणारा सरदेसाई यांचा वाडा….! कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी* 🛑

🛑 *छत्रपती संभाजी महाराजांना अखेरचे पाहणारा सरदेसाई यांचा वाडा….! कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी* 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

संगमेश्वर :⭕ संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईंच्या वाडयात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले.संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईंच्या वाडयात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले.

या घटनेमुळे संगमेश्वरचे नाव दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदविले गेले आहे. हा कटू परंतु सत्य इतिहास आहे. कसबा-संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि वैषम्य वाटते. परंतु तो इतिहास आहे.

संगमेश्वरात संभाजी राजे शत्रूकडून पकडले जाणे, तेथून त्यांना वढू गावी नेऊन त्यांची क्रूरपणे हत्या करणे या मराठयांच्या इतिहासातील दोन्ही घटना दुर्दैवीच आहेत. फंदफितुरीमुळे महाराज पकडले गेले. मग मुघलांनी वाडा मागील बाजूने जाळून टाकला .

परंतु पुढील बाजू शाबूत आहेत तरी, हाही दुर्दैवी तेवढाच कलंकित इतिहास आहे.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून इतिहासप्रेमी, अभ्यासक, कसबा-संगमेश्वरात त्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते. हा इतिहास जपला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वाडयातून शेवटच्या क्षणापर्यंत राज्यकारभार चालविला. ते स्मृतीस्थळ जपले गेले पाहिजे….!!!

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा….⭕

anews Banner

Leave A Comment