Home Breaking News 🛑 *महेश कोठारेंची मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा” लवकरच सुरू. ही वेळ असेल...

🛑 *महेश कोठारेंची मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा” लवकरच सुरू. ही वेळ असेल मालिकेची* 🛑

90
0

🛑 *महेश कोठारेंची मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा” लवकरच सुरू. ही वेळ असेल मालिकेची* 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मनोरंजन :⭕मराठी चित्रपट सृष्टीत अभिनय करताना यश मिळविल्यानंतर महेश कोठारे यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्माते यात देखील यश मिळवले. नंतर त्यांच्या “कोठारे व्हिजन” ने टीव्ही मालिकांकडे कल वाढविला. “जय मल्हार” या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मालिकांची निर्मिती केली. आता कोठारे व्हिजनची “दख्खनचा राजा ज्योतिबा” ही मालिका लवकरच टीव्हीवर दिसणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक भक्तांना ज्योतिबाचे दर्शन झाले नाही. आता मालिकेच्या निमित्ताने सर्व भक्तांना घरी बसून दर्शन घेता येईल. या मालिकेची शूटिंग कोल्हापूर येथे होणार असून त्यासाठी कोल्हापूर येथेच भव्य दिव्य सेट उभारण्यात आला आहे. जय मल्हार मालिकेप्रमानेच या मालिकेला देखील यश मिळेल असे गृहीत धरूनच महेश कोठारे हे मालिकेसाठी जास्त खर्च करताना दिसून येत आहेत.
दिमाखदार पद्धतीने उभारण्यात आलेल्या या सेट वर श्री ज्योतिबाचा दरबार, अंबाबाईचा दरबार, आश्रम, रत्नागिरी गाव असे सर्वच साकारण्यात आले आहे. या मालिकेचे दिग्दर्शन स्वतः महेश कोठारे व मुलगा आदिनाथ कोठारे करणार असून मालिकेत ज्योतिबाच्या भूमिकेत “विशाल निकम” हा अभिनेता दिसून येणार आहे. या मालिकेसाठी विशाल ने 20 दिवसात तब्बल 12 किलो वजन वाढविले आहे.कोणती मालिका होणार बंद?
“दख्खनचा राजा ज्योतिबा” ही मालिका 23 ऑक्टोंबर पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर येणार असून या मालिकेची वेळ संध्याकाळी 6.30 वाजता आहे.

सध्या 6.30 वाजता देवयानी या मालिकेचे पुनः प्रसारण होत असल्याने त्या ऐवजी ही नवीन मालिका दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीच चालू मालिका बंद होणार नाही. परंतु पुढील काळात या मालिकेचा वेळ बदल होवू शकतो….⭕

Previous article🛑 *छत्रपती संभाजी महाराजांना अखेरचे पाहणारा सरदेसाई यांचा वाडा….! कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी* 🛑
Next article🛑 फक्त सव्वा लाखांत मिळत आहेत मारुती सुझुकी कार :- जाणून घ्या माहिती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here