Home बीड केज येथे झालेल्या अपघातात परळीतील एक महिला ठार

केज येथे झालेल्या अपघातात परळीतील एक महिला ठार

42
0

आशाताई बच्छाव

1000287741.jpg

केज येथे झालेल्या अपघातात परळीतील एक महिला ठार

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/केज दि: १४  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून जवळच काही अंतरावर कळंब रोड केज येथे चिंचोलीमाळी या गावावरून पॅसेंजर घेऊन आलेला अपे रिक्षा अचानक पलटी होऊन घडलेल्या अपघातात परळीतील एक महिला जागीच ठार झाली, असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, कमलबाई विठू शिंदे (वय ६० वर्षे). रा. परळी वैजनाथ असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. कमलबाई या बहिणीच्या पतीचे निधन झाल्याने राखसावण्याच्या विधीसाठी परळी येथून केज तालुक्यातील चिंचोलीमाळी या गावी आल्या होत्या. राखसावडण्याचा विधी झाल्यानंतर त्या परळी कडे जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून ॲपे रिक्षामध्ये बसून केज पर्यंत येत होत्या. हा अपेरिक्षा केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच काही अंतरावर आला असता अचानक पलटी झाला. ॲपे रिक्षा पलटी होताच कमलबाई विठू शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याचे नाव मात्र समजू शकले नाही.

Previous articleकामगार नेते मनोज कोलते पाटील जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
Next articleलोकशाहीची आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच रूजविली-अ‍ॅड.मनोज संकाये
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here