Home जालना कामगार नेते मनोज कोलते पाटील जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.

कामगार नेते मनोज कोलते पाटील जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.

122
0

आशाताई बच्छाव

1000282282.jpg

कामगार नेते मनोज कोलते पाटील जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 13/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.यातच जालना लोकसभा मतदारसंघासाठी परंपरागत उमेदवार न देता नवीन उमेदवार देण्याची मागणी जालना लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी केली असून मतदार नवीन उमेदवाराच्या प्रतिक्षेत असतांनाच नवीन उमेदवार म्हणून कामगार नेते मनोज पाटील कोलते यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे शहरी व ग्रामीण भागातुंन स्वागत करण्यात आले आहे.जालना शहरातील व स्थानिक उमेदवार या मुद्द्यावर मनोज कोलते पाटील यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल अशी चर्चा जालना शहरात होतांना दिसत आहे.
मनोज कोलते पाटील यांच्याकडे कामगार संघटना भक्कम असल्याने व नविन चेहरा असल्याने तसेच कामगारांना वेळोवेळी मदत करुन कामगारांवर अन्याय होत असल्यास संकटसमयी त्यांच्यासाठी नेहमीच धाऊन येणारा कार्यकर्ता म्हणून मनोज कोलते पाटील यांची ओळख आहे.त्यांच्या या ओळखीचा फार मोठा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार असल्याची चर्चा शहरी व ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.मनोज कोलते गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील असुन शेतकरी व कष्टकरी, मजुरांच्या कष्टाची जाण असणारा कार्यकर्ता म्हणून नावारूपास आलेला उमेदवार असल्याने त्यांना बहुमताने विजयी करण्याचे काम आम्ही करणार असल्याचे मतदारांनी स्पष्ट केले आहे.मराठा उमेदवार व कामगार नेते म्हणून नावारूपास आलेले मनोज कोलते यांना सर्वच जाती धर्मातील मतदारांनी विजयी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Previous articleआदर्श शिक्षक संपतराव कासोद यांचे 93 व्या वर्षी निधन
Next articleकेज येथे झालेल्या अपघातात परळीतील एक महिला ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here