Home नांदेड विष्णू लोखंडे यांचे निधन अंबादास पाटिल पवार

विष्णू लोखंडे यांचे निधन अंबादास पाटिल पवार

162
0

आशाताई बच्छाव

IMG-20230612-WA0013.jpg

विष्णू लोखंडे यांचे निधन
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधि
लोह्यातील जेष्ठ नाट्यकर्मी, सिने कलावंत तथा तथा परिवहन महामंडळाचे वाहक विष्णू विठोबा लोखंडे यांचे दि. १२ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून, जावई, नातवंडे, भाऊ, बहीण, भावजय, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी दिवंगत शाहीर अण्णा चव्हाण यांच्या अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या होत्या. तसेच झुंज तुझी माझी या मराठी चित्रपटातून भूमिका साकारली होती. सीएससी केंद्र चालक वसंत लोखंडे यांचे ते वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here