Home नांदेड भोकर तालुक्यात भोंदू बाबाला अटक

भोकर तालुक्यात भोंदू बाबाला अटक

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0015.jpg

भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार.                        भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उमरी -भोकर रस्त्यावरील जाकापूर पाटी जवळ तालुका भोकर येथे एक मंदिर उभारून देवी शक्तीच्या नावाखाली अनेक भोळ्या भाबड्या भक्तांना आजारापासून बरे करण्याचे आमिष दाखवून घर संसारात सुख संपत्ती येण्यासाठी नऊवारी करण्याची सांगून कृत्य करून अनेकांची फसवणूक करत असल्याची बाब उघडकीस आली आहे .भोंदू बाबा विरुद्ध भोकर पोलिसात महाराष्ट्रीयन नरबळी आणि अनिष्ट अघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. माधव सखाराम पवार राहणार गणीपूर तालुका उमरी या उच्चशिक्षित तरुणाने भोकर शहरात अवघ्या चार किलोमीटर अंतरावर रस्त्यावरील जाकापूर पाठीजवळ जागा घेऊन एक मंदिर उभारले या मंदिरात दर्शन घेऊन अनेक भक्त येऊ लागले .त्यामुळे त्यातील भोळ्या भावड्या भक्तांकडून तो एक विशिष्ट रकमेची नोंद शुल्क भंडाऱ्यासाठी दान नारळ हळद कुंकू लिंबू पूजेचे सामान यांच्या नावाखाली तो कृत्य करत होता.तर फीस 400रू दोन पेटी 50रू लींबू 50रू असी रक्कम वसूल करण्यात येत होती. दिनांक 19 रोजी तीन वाजता च्या दरम्यान काही अनिसच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य घेऊन भोकर पोलिसात याबाबतचे भांडे फोडले आहे. तसेच यावरून पोलीस निरीक्षक विकास पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे व आदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन भोंदू बाबांना ताब्यात घेतली. त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

Previous articleयंदा आठवड्यापूर्वीच गणपतीच्या आगमनाला सुरुवात!
Next articleमनमाड शहरात निषेध मोर्चा व जेल भरो आ‌ंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here