Home Breaking News यंदा आठवड्यापूर्वीच गणपतीच्या आगमनाला सुरुवात!

यंदा आठवड्यापूर्वीच गणपतीच्या आगमनाला सुरुवात!

57
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0061.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: यंदा आठवड्यापूर्वीच गणपतीच्या आगमनाला सुरुवात! अनेक गणेश मंडळांनी साधला रविवारचा मुहूर्त मोठ्या प्रमाणात मुंबई, वरळी, ठाणे ,लालबाग इत्यादी ठिकाणी गणेश मूर्तीचे आगमन रविवारच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर गणपतीचा उत्साह साजरा होत आहे. त्यामध्ये यावर्षी सरकारने दिलेल्या सूट ही पाहून सर्व गणेश मंडळांनी आठवडाभरापूर्वीच गणपतीच्या आगमनाला सुरुवात केली आहे.त्याचबरोबर त्यांच्या सजावटीची ही सुरुवात झाली आहे. गणेश भक्तांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह पाहायला मिळतोय व सर्वांना गणपतीचे आगमनाचे वेध लागले आहेत असे या ठिकाणी पहायला मिळते .मोठ्या प्रमाणात ढोल, ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन पाहायला मिळते . यावर्षी सरकारचे कुठलेही बंधन या गणेश बाप्पासाठी नाही हा गणेश भक्तांसाठी दिलासा देणारे बातमी आहे. दहा दिवस बाकी असतानाही गणपतीचे आगमन सुरू झाले आहे. मंडळांनी खूप जोमाने तयारी लागलेले आहेत. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर साहित्य वरती १८ टक्के जीएसटी असल्याने गणेश मूर्ती 30 टक्क्याने महाग झाली असली तरी गणेश भक्तांसाठी व मंडळामध्ये कुठलाही परिणाम पाहायला मिळाला नाही. त्याचबरोबर सजावटीचे साहित्य ,देवपूजेचे साहित्य याही खूप मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहेत हे सर्व असतानाही यावर्षी गणेश बाप्पा खूप उत्साहाने व जोमाने साजरा होणार हे नक्की.

Previous articleरत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध पहायला मिळाला
Next articleभोकर तालुक्यात भोंदू बाबाला अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here