Home नाशिक जि प गट विंचूर येथील ब्राह्मणगाव येथे शक्ती वंदन कार्यक्रम संपन्न—

जि प गट विंचूर येथील ब्राह्मणगाव येथे शक्ती वंदन कार्यक्रम संपन्न—

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_085212.jpg

जि प गट विंचूर येथील ब्राह्मणगाव येथे शक्ती वंदन कार्यक्रम संपन्न—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

2024 या वर्षात केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाचे धोरण आखले आहे त्याचा अनुषंगाने त्यांचा आर्थिक स्तर सक्षम झाला पाहिजे. यासाठी विविध माध्यमातून महिला उत्कर्ष सन्मान योजना प्रत्येक घरातील महिलांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने जि. प. गट विंचूर ब्राह्मणगांव येथे शक्ती वंदन अभियाना अंतर्गत भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा उत्तर ग्रामीण सौ स्मिताताई कुलकर्णी यांच्या आयोजनात ब्राह्मणगांव येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सामाजिक कार्यकर्त्या सौ रंजनाताई शिंदे यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला. महिलांचे सौभाग्य , समृद्धीचे प्रतीक म्हणजे केवळ हळद-कुंकू ओटी नसून त्यांचा सन्मान त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास आहे. त्यासाठी आपले कर्तव्यदक्ष आदरणीय पंतप्रधानांनी महिला सन्मानार्थ महिला शक्तीला गती देत विविध योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत महिलांनी एसटी भाड्यात 50% सुट, लेक लाडकी योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, पगार प्रसूती रजा 12 आठवड्यावरून 26 आठवडे, पी एम मातृ वंदना योजना, शहरी विभागात महिलांसाठी शक्ती सदन अंतर्गत वस्तीगृह, महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी बचत गट निर्मिती, सौभाग्य योजने अंतर्गत 2.88 कोटी घरांचे विद्युतीकरण, जनधन योजना, आयुष्मान भारत योजना, ई श्रम कार्ड, अशा अनेक योजनांची माहिती सौ स्मिताताई कुलकर्णी यांनी देत त्या योजनेसाठी लाभार्थी महिलांना सदरील योजनेचे कागदपत्र पूर्तता माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांनी स्थानिक प्रश्न जसे आरोग्य सुविधा शौचालय दुरावस्था रेशन कार्ड बंद अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली. त्या सर्व समस्या तसेच त्यावरील तात्काळ उपायोजनासाठी ब्राह्मणगाव चे उपसरपंच राहुलजी शेवाळे, ग्रामसेवक ज्ञानदेव जी साळुंखे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी परिसरातील माता भगिनी उपस्थित होत्या.

Previous articleतृणधान्याचा आहारात उपयोग करणे गरजेचे – सोनकांबळे एम .जी.
Next articleलासलगाव भाजपा मंडळातील 76 राम भक्तांचा आयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न—-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here