• Home
  • एक हजार बेड्सच्या हॉस्पिटलला उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा? मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

एक हजार बेड्सच्या हॉस्पिटलला उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा? मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 एक हजार बेड्सच्या हॉस्पिटलला उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा? 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 17 जून : ⭕ ठाणे महापालिकेने उभारलेल्या १००० बेड्सच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या आपत्तीत शहरात दररोज १५० हून अधिक रुग्ण आढळत असताना, हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पाच दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती. आता संपूर्ण काम झाले आहे.

मात्र, तातडीने रुग्णालय का सुरू केले जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन रखडले आहे का? उद्घाटनाशिवाय हॉस्पिटल सुरू करायचेच नाही का, सद्याच्या भीषण स्थितीत उद्घाटनाचा घाट घालण्याची आवश्यकता आहे का, असा सवाल नगरसेवक डुंबरे यांनी विचारला आहे. या रुग्णालयात ५०० खाटा विना ऑक्सिजन, तर ५०० खाटा ऑक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध राहणार आहेत. तर १०० बेड्सचे आयसीयू युनिट अस्तित्वात येईल. सध्या ठाणे शहरातील सिव्हील हॉस्पिटल व अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाही. मुंबईतील रुग्णालयांत बेड्सचा शोध घ्यावा लागत आहे.

अशा परिस्थितीत १००० खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. मात्र, ते का सुरू केले जात नाही. याबाबत सत्ताधारी शिवसेना व महापालिकेकडून युद्धपातळीवर हालचाली का केल्या जात नाहीत, असा सवाल डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले. त्याच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला होता. त्यावेळी कोणत्याही उद्घाटनाशिवाय तातडीने रुग्णालय सुरू करण्याचा इशारा भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी दिल्यानंतर, महापालिकेने दुसऱ्याच दिवशी रुग्णालय सुरू केले होते. त्याच पद्धतीने ठाण्यातही प्रशासनाला इशारा हवा आहे का, असा सवाल डुंबरे यांनी केला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment