*ठेंगोडा सरपंचपदी भारती बागूल बिनविरोध*
सटाणा,( जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- ठेंगोडा येथील सरपंचपदी भारती देविदास बागूल यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच मधुकर व्यवहारे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.कोरोनामुळे रिक्त जागेवरील निवड काही दिवस लांबली होती.या काळात प्रभारी सरपंच म्हणून प्रदीप शेवाळे हे काम पाहत होते.रिक्त असलेल्या जागेसाठी काल मंगळवारी निवडणूक झाली.एकच अर्ज आल्याने भारती बागूल यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जी.डी.कुलकर्णी तलाठी योगेश मेश्राम ग्रामविकास अधिकारी एस एम वाघ यांनी जाहिर केले.
