Home Breaking News नांदेड” कोरोना पाॕझेटिव्ह झालेले ९ रूग्ण बरे तर १६ नवीन व्यक्ती कोविड...

नांदेड” कोरोना पाॕझेटिव्ह झालेले ९ रूग्ण बरे तर १६ नवीन व्यक्ती कोविड १९ बाधित, नांदेड,दि. १ ; राजेश एन भांगे

120
0
नांदेड" कोरोना पाॕझेटिव्ह झालेले ९ रूग्ण बरे तर १६ नवीन व्यक्ती कोविड १९ बाधित,
नांदेड,दि. १ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 7 बाधित व्यक्ती, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भित झालेला 1 बाधित व्यक्ते असे एकुण 9 बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 391 बाधितांपैकी एकुण 292 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील 82 बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 17 व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवार 1 जुलै रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 87 अहवालापैकी 56 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले. या बाधितांमध्ये बाफना परिसरातील 28 व 64 वर्षाचे 2 पुरुष, आंबेडकर नगर येथील 5 वर्षाची बालिका व 33 वर्षाचा 1 पुरुष, आसर्जन येथील 4 बाधित व्यक्तींपैकी 10, 11 व 37 वर्षाच्या 3 महिला, 42 वर्षाचा 1 पुरुष, विनायकनगर येथील 34 वर्षाची 1 महिला, वसंतनगर येथील 52 वर्षाची 1 महिला, गाडीपुरा येथील 54 वर्षाची 1 महिला, आनंदनगर परिसरातील 36 वर्षाची 1 महिला, अनिकेतनगर भावसार चौक येथील 65 वर्षची 1 महिला, कंधार तालुक्यातील सोमला तांडा उमरज येथील 65 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व 38 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.
उपचार घेत असलेल्या 82 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 13 बाधितांची (7 महिला आणि 6 पुरुष बाधित ) प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 82 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 30, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 6 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले. बुधवार 1 जुलै रोजी 84 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 787,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 522,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 652,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 391,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 9,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,
मृत्यू संख्या- 17,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 292,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 82,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 84 आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleमोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.* प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान
Next articleदि.२/७/२०२० भिला आहेर मेशी:- सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी धोबीघाट येथे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here