• Home
  • मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.* प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान

मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.* प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान

*ई फायलिंगद्वारे* *न्यायालयीन* *कामकाज सुरळीत पार* *पाडावे.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.*

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान.

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडावे. वकिलांनी काळानुसार बदलून इ-फायलिंगसारख्या तंत्रज्ञानाद्वारे दावे व केसेस दाखल करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी केले.
सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व वकिलांना ई फायलिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश 3 महेश जाधव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.राउळ, जिल्हा बारचे अध्यक्ष आर.बी.गावडे, सचिव गुरुप्रसाद माळकर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक संभाजी पाटील, न्यायसंकुलातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाडगे म्हणाले, देश कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन झाला आहे. न्यायालयातील कामकाज नियमितपणे चालू करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने पक्षकारांची गैरसोय टाळणे व वेळेत प्रकरणे दाखल करण्याकरिता ई फायलिंग प्रशिक्षणाचा सर्व वकिलांना याचा चांगला फायदा होणार आहे.

anews Banner

Leave A Comment