• Home
  • *सटाणा परिसरात किरकोळ व्यापार्‍यांचा भावनांचा उद्रेक बिडी,तपकीर,गुटखा एजंट्सला धडा शिकविण्याचा एकमुखी निर्णय* सटाणा (ब्युरो टिम युवा मराठा न्युज

*सटाणा परिसरात किरकोळ व्यापार्‍यांचा भावनांचा उद्रेक बिडी,तपकीर,गुटखा एजंट्सला धडा शिकविण्याचा एकमुखी निर्णय* सटाणा (ब्युरो टिम युवा मराठा न्युज

*सटाणा परिसरात किरकोळ व्यापार्‍यांचा भावनांचा उद्रेक
बिडी,तपकीर,गुटखा एजंट्सला धडा शिकविण्याचा एकमुखी निर्णय*
सटाणा (ब्युरो टिम युवा मराठा न्युज)-लाॅकडाऊन काळापासुन आजपर्यंत मनमानी पद्धतीने डबल,टिबल भावाने बिडी तपकीर गुटखा विक्री करणार्‍या एजंट्स विरोधात किरकोळ व्यापार्‍याच्या भावनांचा उद्रेक होऊन आज अखेर असंख्य किरकोळ व्यापार्‍यांने एकमेकाशी फोनवर बोलुन येत्या बारा तासात ह्या एजट्ंसने भाव पूर्ववत न केल्यास व
किरकोळ व्यापार्‍यांची अडवणूक केल्यास धडा शिकवायचाच असा निर्णय घेण्यात आला .लाॅकडाऊन काळापासुन किरकोळ व्यापारी ग्राहकांच्या विनाकारण शिव्या खात आहे. एजट्स मनमानी पद्धतीने भाव लावत असल्यामुळे बाजारातील बिडी तपकीर गुटखा याचे भाव वाढले आहे एजट्स मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत व किरकोळ व्यापारी ग्राहकाच्या रोषास सामोरा जात आहे .यापुढे हे चालु द्यायचे नाही.
यासाठी कंपनी व्यवस्थापन, ग्राहक तक्रार निवारण कक्ष फुड डिपार्टमेन्ट व संबधित आधिकार्‍याकडे ह्या एजट्सच्या तक्रारी करण्याचे ठरले आहे किरकोळ व्यापार्‍याने बिडी तपकीर शिगरेटची बिले घ्यावित बिले न दिल्यास त्यांना बाहेर ओढुन काढायचे
व रीतसर तक्रार दाखल करायची असे ठरविण्यात आले आहे.
बिडी तपकीर घेणार्‍या किरकोळ व्यापार्‍यांना इतर माल घेण्याचे कंपलशन करणार्‍या त्या व्यापार्‍यांच्या विरोधात तर किरकोळ व्यापार्‍यांनी शिव्यांचा वर्षाव केला .कंपनी व्यवस्थापनाकडे केलेल्या तक्रारीत कंपनीने ठरवुन दिलेले दर पत्रक लावण्याची मागणी केली आहे .मिनटा मिनटाला भाव वाढविणार्‍या एजट्सने किरकोळ व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला आहे .

anews Banner

Leave A Comment