Home नांदेड जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण

जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण

52
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview.png

जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा
4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 11 :– जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली असून लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला 4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे.

आज पर्यंत 29 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या 9 पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. इतर प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 83 गावे लम्पी बाधित आहेत. या 83 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 36 हजार 150 एवढे आहे. यातील 697 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 433 एवढी आहे. एकुण गावे 516 झाली आहेत. या बाधित 83 गावांच्या 5 किमी परिघातील 516 गावातील (बाधित 83 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 38 हजार 974 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 29 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Previous articleबालकांच्या निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर
Next articleवडगावात वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here