Home Breaking News मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटना (WHO) या...

मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संघटनेच्या (सर्पदोष व्यवस्थापन तज्ञ समिती) सदस्यपदी नियुक्ती..

109
0

मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संघटनेच्या (सर्पदोष व्यवस्थापन तज्ञ समिती) सदस्यपदी नियुक्ती..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क
एक यशस्वी धन्वंतरी मा.डाॅ.दिलीप पांडुरंगराव पुंडे
वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन म्हणजेच WHO या जागतीक आरोग्य संघटनेने आपल्या
सर्पदंश व्यवस्थापन तज्ञाच्या यादीत .मा.डाॅ.दिलीप पुंडे यांचा समावेश करुन जागतिक ओळख देऊन सन्मान दिला.
पुंडेसाहेबांचा १९८८ पासूनचा मुखेड येथील वैद्यकीय सेवेचा आलेख रोमहर्षक असाच आहे.
वाघमारे यांच्या ईमारती मध्ये लाकडी टेबल खूर्ची पासून सुरु झालेली वैद्यकीय सेवा अद्ययावत सूपर स्पेशाॅलीटी पूंडे हाॅस्पीटल पर्यंतचा प्रवास आपल्या दैदीप्यमान बूद्धीमत्तेवर आज जागतीक पातळीवर पोंहचला आणि आता सर्पदंश तज्ञ म्हणुन ख्यातनाम होण्यापर्यंत झालेला हा अभिमानास्पद प्रवास म्हणुनच ऊल्लेखनीय आहे.
आंम्ही या सर्व घटनाक्रमाचे भाग्यवान साक्षीदार आहोत कारण साहेब ह्रदयरोग तज्ञ म्हणुन मुखेडवासीयांची काळजी घेत होतेच परतूं आपल्या ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय त्यामुळे लोकांना रात्री बेरात्री अपुर्‍या साधनातच शेतात वा इतर ठिकाणी काम करावे लागते. त्यातून सर्पदंशाचे वाढते प्रमाण अन् जवळपास ऊपचार ऊपलब्ध होत नव्हते.
लोकांची मंत्रतंत्राच्या खाजगी ऊपचारावर भीस्त होती.
हे पाहून पुंडेसाहेबांनी सर्पदंशावर यशस्वी ऊपचार सुरु केले.
त्यांनी यांवर संशोधन करून आपल्या भागातील वेगवेगळ्या जातीच्या विषारी बिनविषारी सर्पजातीचा अभ्यास करुन आलेल्या पेशंटचा सखोल परीक्षण करुन स्वतःची ऊपचार पद्धती विकसीत केली ती एवढी परीणामकारक सिद्ध झाली की पंचक्रोशीत सर्पदंश चिकीत्सेचा परावलीचा शब्द म्हणजेच डाॅ.दिलीप पुंडे असे समीकरण तयार झाले
त्यातूनच त्यांना वैद्यकीय शेत्रात विविध संस्थाकडून परीसंवादात मार्गदर्शनासाठी आंमत्रीत करण्यात येवू लागले.
त्यांच्या कार्याची ओळख भारतात राष्ट्रीय पातळीवर होत होती.
त्यांची राष्ट्रीय सर्पदंश व्यवस्थापन समीतीच्या सदस्य पदी निवड झाली.त्या समीतीत पूंडेसाहेबांनी सूचवीलेल्या ऊपाययोजना सर्पदंशावर प्रभावी सिद्ध झाल्या,
यातुनच त्यांना नेपाळ, लंडनला वैद्यकीय परीसंवादात भाग घेण्याची संधी मिळाली.
त्या परीसंवादात त्यांनी केलेले सर्पदंशावरील अभ्यासपूर्ण संशोधनावरिल व्याख्यान खुप गाजले.
ऊपस्थीतांचे लक्ष वेधणारे ठरले.
त्यानंतर त्यांना जागतीक मान्यता मिळत गेली वरचेवर विविध सेमीनाॅर मध्ये त्यांची ऊपस्थीती अनिवार्य होत गेली. त्यातुन त्यांचे संशोधन परीपूर्ण झाले सर्पदंश ऊपचार पद्धती विकसित झाली.
त्याचा लाभ ग्रामिण जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे.
त्यांच्या या सर्व बुहूमुल्य संशोधनाची परीणीती म्हणुन त्यांना जागतिक स्तरावरील सर्पदंश चिकीत्सा व व्यवस्थापन तज्ञ म्हणुन मान्यता मीळाली.
पुंडेसाहेब म्हणजे मुखेडच्या सांस्कृतीक,आरोग्य क्षेत्र,फीटनेस,रक्तदान, वैचारीक अशा सर्व चळवळीचे केंद्रबिंदु आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रसंगी मोठ्या प्रमाणावर निधी संकलन करून आपादग्रस्तांना दिलासा देण्याचे ही कार्य त्यांच्या हातून घडले.
ते चालते बोलते विश्व विद्यालयच आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे ते वैयक्तीक मार्गदर्शक आहेत.मी सुद्धा त्यातला एक भाग्यवान आहे मला ही माझ्या अडचणीच्या प्रसंगी मोलाचे मार्गदर्न लाभले मी त्यांचा कायम ऋणी आहे.त्यांचे मार्गदर्शन अवीस्मरणीय असेच आहे.
साहेबांवर कीती ही लीहले तरी शब्द कमी पडतील.
एवढे त्यांचे कार्य महान आहे.
पुंडेसाहेबांच त्रिवार अभिनंदन !
आणि भावी कार्यास शुभेच्छा!

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…
Next articleनांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here