• Home
  • नांदेडात मुंबईच्या एका रुग्णासह, दिवसभरात १६ जणांना सुट्टी, तर ३ रुग्णांची भर,२१ रुग्णांवर उपचार सुरू*

नांदेडात मुंबईच्या एका रुग्णासह, दिवसभरात १६ जणांना सुट्टी, तर ३ रुग्णांची भर,२१ रुग्णांवर उपचार सुरू*

*नांदेडात मुंबईच्या एका रुग्णासह, दिवसभरात १६ जणांना सुट्टी, तर ३ रुग्णांची भर,२१ रुग्णांवर उपचार सुरू*
*नांदेड,दि १ ; राजेश एन भांगे*
नांदेड जिल्ह्यातील सोमवार दिनांक 1 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 116 अहवाला पैकी 108 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 149 एवढी झाली आहे.

आज दिवसभरात प्राप्त झालेले 3 ही पॉझिटिव रुग्ण पुरुष आहेत, व या रुग्णांपैकी 2 रुग्ण वय वर्ष 25 व 35 हे देगलूर नाका भागातील आहे, 1 रुग्ण वय वर्षे 40 शिवाजीनगर भागातील असून, त्यांच्यावर पंजाब भवन covid-19 सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

व तसेच सोमवार दिनांक 1 जून 2020 रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 2 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय उमरी येथील 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय माहूर येथील एक रुग्ण आणि मुंबई येथील संदर्भित करण्यात आलेला 1 रुग्ण असे एकूण 16 रुग्ण बरे झाल्यामुळे, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

आत्तापर्यंत 149 रुग्णांपैकी 120 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे, व 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फरार आहेत, उर्वरित 21 रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण ज्यांची वय वर्ष 52 व 65 आणि 1 पुरुष ज्याचे वय वर्ष 38 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.

रविवार दिनांक 31 मे 2020 रोजी प्रलंबित असलेल्या 187 स्वॉब तपासणी अहवाल पैकी 116 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित 71 अहवालांचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल, व दिनांक 1 जून 2020 रोजी 105 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहेत त्यांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 3 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️ दिवसभरात 16 रुग्णांला सुट्टी
☑️ एकूण पॉसिटीव्ह रुग्ण संख्या 149 वर.
☑️ आत्तापर्यंत 120 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️21 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️1 संदर्भीत रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू
☑️ 2 महिला व एका पुरुष रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

anews Banner

Leave A Comment