• Home
  • मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे

मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे

🛑 मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे हजारांपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्याची काळजी म्हणून अभिनेता सलमान खानने एक लाख सॅनिटायझर बॉटलचा पुरवठा मुंबई पोलिसांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमानच्या या मदतीबद्दल ट्विटरवरून त्याचे आभार मानले आहेत. आपल्या मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल सलमान तुझे आभार ! असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

देशात लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रोजगारही थांबला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलमानने आपली जबाबदारी ओळखून यापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील २५ हजार कामगारांना मदत केली होती. या कामगारांना काम नसतानाही वेतन देण्याचे काम सलमानने केले. त्यानंतर, मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सलमान पुढे आला आहे.

आपल्या बिइंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सलमानने एक लाख सॅनिटायझरच्या बाटल्स मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या राज्यातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. यात मुंबईतील १३ पोलिसांचा समावेश आहे. २३६ अधिकारी, १,८५९ अंमलदार मिळून एकूण २,०९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८७९ उपचाराअंती बरे झाले आहेत. यात ७५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.⭕

anews Banner

Leave A Comment