• Home
  • सॅनिटायझरच्या बॉक्समधून सुरू आहे या जीवघेण्या पदार्थाची तस्करी, मुंबईत रॅकेट उघड

सॅनिटायझरच्या बॉक्समधून सुरू आहे या जीवघेण्या पदार्थाची तस्करी, मुंबईत रॅकेट उघड

  • 🛑 सॅनिटायझरच्या बॉक्समधून सुरू आहे या जीवघेण्या पदार्थाची तस्करी, मुंबईत रॅकेट उघड 🛑
    मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

भिवंडी 1 जून: ⭕ कोरोना व्हायरसमुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचा पुरवढा आता करण्यात येत आहे. मात्र याच पुरवढ्याच्या आडून तस्करीचा भांडाफोड झालाय. भिवंडीतून मुंबई आणि परिसरात सॅनिटायझरच्या बॉक्समधून जीवघेण्या गुटख्याची तस्करी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी उघड केलं असून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने सॅनिटायझरच्या नावाखाली कंटेनर मधून गुटख्याची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील राहनाळ इथं उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत 38 लाखाचा गुटखा आणि कंटेनर जप्त केला आहे.

विशेष म्हणजे  गुटखा वाहतूक आयुर्वेदिक सॅनिटायझर,श्वान शाम्पू अशा वस्तू असलेल्या बॉक्स मागे गोणी ठेवून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात अन्नसुरक्षा  कायदा 2006 भारतीय दंड संहिता कायद्या नुसार नारपोली पोलीस स्टेशन याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुर केली असून त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार  असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरात हा गुटखा पोहोचवला जात होता. गुटख्याने कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याने यावर सरकारने बंदी घातलेली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment