Home जालना पक्ष वाढीसंदर्भात रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न

पक्ष वाढीसंदर्भात रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न

47
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230614-072843_WhatsApp.jpg

पक्ष वाढीसंदर्भात रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः पक्ष वाढीसंदर्भात मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी जालना येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दि. 12 जून रोजी पक्ष कार्यालयात बैठक घेवून विविध सुचना दिल्या. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर व पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे म्हणाले की, आगामी काळात निवडणुकांचे वारे वाहणार आहे. या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून गाव तेथे शाखा आणि घराघरात कार्यकर्ता तयार करावा असे त्यांनी सांगीतले. बनसोडे यांचा रिपब्लिकन सेना जालन्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच   तृतीय पंथीय विद्या कोळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. जालना तालुक्यातील सावरगाव येथील नितीन आढाव, अर्जुन आढाव, संदीप आढाव, रतन आढाव आणि बदनापूर तालुक्यातील संगीता पाटोळे, परतूर तालुक्यातील जालिंदर भालके, धंमदीप भालके, प्रविण आव्हाड, विजय मुंढे, समाधान सिरसाट, अशोक मुंढे, छगन बोराडे, राजाराम पवार याच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यावेळी या सर्व नुतन कार्यकर्त्यांचे हार घालुन स्वागत करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बबन साठे, शहर उपाध्यक्ष सुनिल पांडे, शेषराव दाने, ज्ञानदेव खरात आदींची उपस्थिती होती.

Previous articleशिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा रणरणत्या उन्हात भुमिहिन कास्तकरांची मोठी उपस्थिती
Next articleभालेराव खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या ः रिपब्लिकन सेनेची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here