Home जालना शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा रणरणत्या उन्हात भुमिहिन कास्तकरांची मोठी...

शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा रणरणत्या उन्हात भुमिहिन कास्तकरांची मोठी उपस्थिती

52
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230614-072103_WhatsApp.jpg

शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
रणरणत्या उन्हात भुमिहिन कास्तकरांची मोठी उपस्थिती
जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना निवेदन
जालना, (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-मराठवाड्यातील विशेषता जालना जिल्हातील दलित
आदिवासी भूमिहीन कास्टकरांचे शेतीसाठी झालेले शासकीय पड जमिनी वरील
अतिक्रमण नियमानुकुलीत करून सातबारा उतार्‍याला नावे घेण्यात यावा या
मागणीसाठी  १२ जून रोजी जालना येथील अंबड चौफुली ते शासकीय विश्रामगृह
धडक मोर्चा आणि मागच्या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या
नेतृत्वात शिष्टमंडळाने निवेदन दिले. दरम्यान भर उन्हात भुमिहिन कास्तकर
मोठ्या संख्येने या विराट मोर्चा सहभागी झाले होते. यावेळी सातबारा
आमच्या हक्का.. सातबारा द्या..सातबारा द्या… अशा घोषणा यावेळी
उपस्थितांनी दिल्या. या विराट मोर्चात जिल्ह्यातील कोना-कोपर्‍यातून
मोर्चेकरी सहभागी झाले होते.
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या
उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देण्यात
आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील दलित आदिवासी भूमीहीन
कास्ट पट्टे व स्थानिक दलित आदिवासी भूमिहीन लाभार्थ्यांना शासनाने
प्रदान केलेल्या शेतजमिनी उदाहरणार्थ उदा. सिलिंग अ‍ॅक्ट मधील शासकीय
गायरान जमिनी, इनामी जमिनी इत्यादी संगणकीय सातबारा वरून लाभार्थ्याचे
नाव समोरील क्षेत्र पोट खराबी मध्ये दाखवत असल्याने शासकीय योजनेचा लाभ
आणि बँकेचे कर्ज मिळत नसल्यामुळे लाभार्थी क्षेत्र दुरुस्ती करून पूर्वत
करण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची
प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

Previous articleलोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
Next articleपक्ष वाढीसंदर्भात रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here