Home बीड बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला धुळेला एसीबीने घातल्या बेड्या

बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला धुळेला एसीबीने घातल्या बेड्या

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_195107.jpg

बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला धुळेला एसीबीने घातल्या बेड्या

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: ०३  बीड शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीला असलेल्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ३५ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहे. राजकीय सहकार्याशी मतभेद झाल्याने त्यांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने, व हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेतली व तुमच्यावर गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्याची माहिती काढून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवून तुम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येईल. मात्र कारवाई होऊ द्यायची नसेल तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना ०२ लाख रुपये द्यावे लागतील. असे सांगून तक्रादाला पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदाराने दि. ०१ एप्रिल रोजी धुळे येथील एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष ०२ लाख रुपये लाचेची मागणी करून रक्कम पोलीस हवालदार नितीन अंबादास मोहने व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दीड १५०,००० रुपची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. व सोमवारी सायंकाळी दोंडराईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारीला, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सुमारे ६० लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने सुमारे ७७ हजार रुपयांची चांदीची भांडी व दागिने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे ०१ कोटी ७५ हजार रुपयाच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here