• Home
  • 🛑 पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला तब्बल 7 पोती शेंदूर, अन् मग समोर आलं 🛑

🛑 पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला तब्बल 7 पोती शेंदूर, अन् मग समोर आलं 🛑

🛑 पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला तब्बल 7 पोती शेंदूर, अन् मग समोर आलं 🛑
✍️ 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यातील रास्ता पेठेतील श्री उंटाडे मारुती हा गेल्या कित्येक वर्षांपासून पुणेकरांचं श्रद्धास्थान राहिलं आहे. श्री उंटाडे मारुती विषयी अनेक पुणेकरांच्या मनात एक वेगळी श्रद्धा आहे.

रास्ता पेठेतील श्री उंटाडे मारुतीचे हे मंदीर जवळपास 350 वर्षांपुर्वीचं आहे.
नुकतंच या मारुती मंदिराच्या वज्रलेपनाचे काम पार पडले. मारुतीच्या या मुर्तीवर जवळपास गेल्या 350 वर्षांपासून न काढलेला शेंदूर होता. हा शेंदुर जवळपास एक ते दिड फूट जाडीचा होता. हाच शेंदूर काढत त्याच्यावर वज्रलेपण करण्यात आलं आहे.

रास्ता पेठेतील प्रसिद्ध शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांनी हे काम यशस्विरीत्या पार पाडले आहे. श्री उंटाडे मारुतीच्या मुर्तीवरुन जवळपास 7 पोती शेंदूर निघाला आहे. जवळपास गेल्या 350 वर्षांपासून न काढलेला शेंदूर पुर्णपणे निघाल्यानंतर आतमध्ये अतिशय देखणी, सुबक आणि काळ्या पाषाणातील मुर्ती प्रकट झाली.

ही मुर्ती 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद आहे. श्री उंटाडे मारुतीचा हा चेहरा मानवी असून अतिशय मोहक आहे. उंटाडे मारुतीच्या मुर्तीला भारदार मिश्या आहेत. या मारुतीच्या डोक्यावर मुगुट आहे. हा मुगुट कमलपुष्पाप्रमाणे आहे.
तसेच श्री उंटाडे मारुतीचा उजवा हात आशिर्वादपर वरती असून डाव्या हातात गदा आहे.

मारुतीच्या दोन्ही पायांमध्ये कली झोपलेला आहे. या मारुतीने कलीवर विजय मिळवला असल्यांची भाविकांची श्रद्धा आहे. हे एक जागृत देवस्थान आहे.

पेशवाईच्या काळात पेशव्यांचे सेनाप्रमुख सरदार रास्ते यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उंट येथे बांधले जात. यामुळे या मारुतीचे नाव श्री उंटाडे मारुती असं पडलं. 1908 साली सरदार श्रीनिवास मुरलीधर यांनी त्यांची जागा KEM हॉस्पिटलला दिली. त्यासोबतच त्यांनी या मंदिराचा जिर्णाेद्धार देखील केला.दरम्यान, 1953 साली या ट्रस्टची नोंदणी झाली आहे.

येथील मुख्य ट्रस्टी सरपंच म्हणून ओळखले जातात. आता या ट्रस्टचे सरपंच प्रदिप मुरलीधर हे आहेत. येत्या 2 मार्च रोजी श्री उंटाडे मारुतीची पुन:प्रतिष्ठापणा होत आहे…⭕

anews Banner

Leave A Comment