• Home
  • 🛑 जनता केंद्र वाचनालय, आपला चौथा स्तंभ आणि मित्रांच्या कविता तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष काव्यस्पर्धा संपन्न 🛑

🛑 जनता केंद्र वाचनालय, आपला चौथा स्तंभ आणि मित्रांच्या कविता तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष काव्यस्पर्धा संपन्न 🛑


🛑 जनता केंद्र वाचनालय, आपला चौथा स्तंभ आणि मित्रांच्या कविता तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष काव्यस्पर्धा संपन्न 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई-⭕फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला जाहीर निवेदनाद्वारे पहिल्या फेरीसाठी कविता मागवून त्यातून तीस कविता दुसऱ्या फेरीसाठी उपरोक्त संस्थांकडून निवडल्या गेल्या होत्या आणि दुसरी फेरी ही कविता सादरीकरणाची होती ,ती मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी २०२१ जनता केंद्र वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सायंकाळी संपन्न झाली.सदर स्पर्धा आपला चौथा स्तंभचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजयकुमार बांदल सर आणि जनता केंद्राच्या विश्वस्त ,आपला चौथा स्तंभच्या उपाध्यक्षा ऍड प्रीती बने मॅम यांच्या पुढाकाराने आणि मित्रांच्या कविता या समूहाच्या सहकार्याने पूर्णत्वास गेली.

सदर कार्यक्रमास दापोलीतील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार इक्बाल शर्फ मुकादम प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.सदर स्पर्धेचे परिक्षण काव्यरसिक मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी , गझलकार हेमंत राजाराम, कवी मनोहर जाधव आणि कवयित्री/लेखिका जागृती सारंग यांनी अगदी निःपक्षपातीपणे पाहिले.कल्याण येथील गझलकार सुधाकर कांबळी यांच्या गझलने या स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर चिंतामणी पावसे ,दापोली यांच्या राजे या कवितेने द्वितीय क्रमांक तर मुंबईतल्या गौरी शिरसाट यांच्या गझलेने तृतीय क्रमांक पटकावला. चेतन मोरे,गणेश सुतार यांच्या कविता उत्तेजनार्थ ठरल्या.

याप्रसंगी मित्रांच्या कवितातील शाहीर ,गीतकार ,सेलिब्रिटी कवी निलेश उजाळ, शाहीर निलेश पवार, ग्रामीण कवी भावेश लोंढे, मालवणी कवी,शिवव्याख्याता काव्यप्रसाद प्रसाद गोठणकर , कवयित्री विनया कविटकर उपस्थित होते. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन मित्रांच्या कवितांचे सर्वेसर्वा ,कवी ,गझलकार ,कथालेखक पांडुरंग महादेव जाधव यांनी केले.⭕

anews Banner

Leave A Comment