Home बुलढाणा पत्रकारांविषयी बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगांव येथील डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांच्यावर कारवाई...

पत्रकारांविषयी बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगांव येथील डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांच्यावर कारवाई करा

126
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_070107.jpg

पत्रकारांविषयी बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगांव येथील डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांच्यावर कारवाई करा

पत्रकारांनी दिले संग्रामपूर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

ब्युरो चीफ बुलढाणा ज्ञानेश्वर पाटील/ – मागील ४ ते ५ दिवसांपासून काहीही कारण नसताना खामगाव शहरातील स्त्रिरोगतज्ञ डॉ. पांडुरंग गुलाबराव हटकर यांनी अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच पत्रकार बांधवांना वैयक्तीकरित्या तसेच स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर व फेसबूकवर दैनिक सत्यप्रतचे संपादक आनंद गायगोळ यांची तसेच पत्रकारांची बदनामीकारक मजकूर टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
त्या बोगस पत्रकाराच्या दिवाळी पॉकीटाची चर्चा ! दिवाळी भेट दिली नाही म्हणून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केले, पत्रकार आनंद गायगोळ विरूध्द डॉ. पांडुरंग हटकर यांची तक्रार अशा मथळ्याखाली बातमीस्वरूपात पोस्ट तयार करून सोशल मिडीयाचा गैरवापर करीत पत्रकारांच्या बदनामीचा प्रयत्न केला आहे. याशिवाय पत्रकारांच्या बाबतीत बराचसा चुकीचा व बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला आहे. त्यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये नमुद मजूकर पुर्णपणे खोटा असून वास्तविक पाहता पत्रकार आनंद गायगोळ हे दिवाळी जाहीरातसाठी डॉ.हटकर यांच्याकडे कधीही गेलेले नाहीत. तसेच डॉ.हटकर यांची कोणतीही बातमी त्यांनी प्रकाशित केली नाही. परंतु तरी सुध्दा डॉ.हटकर हे बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो डॉ हटकर हे म्हणतात पत्रकार आनंद गायगोळ यांनी विस दिवसांपूर्वी दवाखान्यात येऊन जाहिरात मागीतली होती मग विस दिवसांपूर्वी व अद्यापही पोलीसात का तक्रार दिली नाही तसेच जाहिरात मागतांनाचा दवाखान्यातील सि.सि.टि.व्ही चे व्हिडिओ सार्वजनिक का करत नाहीत.अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर डॉ हटकर देत नाहीत डॉ हटकर फक्त पत्रकार आनंद गायगोळ यांना बदनाम करत आहे तसेच भविष्यात देखील डॉ. हटकर यांचेकडून सोशल मिडीयाचा गैरवापर करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होवू शकतो याची देखील दखल घ्यावी.
सोशल मिडियाचा गैरवापर करून पत्रकारांची बदनामी करणार्‍या डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा पत्रकारा बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,अश्या आशयाचे निवेदन सुनील मुकुंद,शेख रफिक, काशिनाथ मानकर, अमोल ठाकरे, विवेक राऊत, विठ्ठल निंबोळकार, पुंडलिक खानझोडे, सचिन पाटील, नारायण सावतकार, स्वप्निल देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, दयालसिंग चव्हाण, अनिल सिंग चव्हाण, अब्दुल शेख, भगवान पाखरे, संतोष आगलावे, रवींद्र धर्माधिकारी, शे.रफीख,शेख कदीर, मंगेश टाकसाळ, रामेश्वर गायकी पिन्टु दाभाडे यांच्या सह मोठ्या संख्येने निवेदन देतांना पत्रकार उपस्थित होते.

Previous articleअखेर अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पत्राची दखल
Next articleचाळीसगावच्या बालकांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सह्याद्री प्रतिष्ठानने केले कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here