Home जळगाव चाळीसगावच्या बालकांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सह्याद्री प्रतिष्ठानने केले कौतुक

चाळीसगावच्या बालकांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सह्याद्री प्रतिष्ठानने केले कौतुक

84
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_070600.jpg

चाळीसगावच्या बालकांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सह्याद्री प्रतिष्ठानने केले कौतुक

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील महावीर कॉलनी परिसरातील दीपक ठाकरे यांचे चिरंजीव
ओम ठाकरे आणि त्याचे मित्र-मैत्रिणी यांनी मिळून दिवाळीमध्ये सुंदर असा किल्ला बनवला असून मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
आपल्या अंगणामध्ये बनवलेला हा किल्ला त्यावरील रोषणाई विविध रंगातील लाइटिंग यामुळे किल्ला पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक भेट देत आहेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना या ठाकरे परिवाराने किल्ला पाहण्यासाठी आमंत्रित केले असता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष ॲड. रणजित पाटील, जितेंद्र वाघ, बाळासाहेब सोनवणे यांनी भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली.
जवळपास आठ दिवस मेहनत घेऊन या मुलांनी हा किल्ला बनवला आहे ओम ठाकरे, रेणुका ठाकरे, प्रेम शिंदे, प्रसाद वडनेरे, साई शेलार, मयूर रोकडे, दक्ष देशमुख, आदित्य जाधव, पायल शिंदे, दिव्या जाधव, परी वडनेरे, तनु खान कृष्णा माळी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here