Home नाशिक पालखेड ग्रा.प.उपसरपंचपदी संजय थेटे यांची बिनविरोध निवड—

पालखेड ग्रा.प.उपसरपंचपदी संजय थेटे यांची बिनविरोध निवड—

121

आशाताई बच्छाव

IMG-20230523-WA0034.jpg

पालखेड ग्रा.प.उपसरपंचपदी संजय थेटे यांची बिनविरोध निवड—

दैनिक युवा मराठा 
निफाड रामभाऊ आवारे

पालखेड मिरचीचे ता निफाड येथील ग्रामपालिका उपसरपंचपदी संजय पंढरीनाथ थेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
पालखेड ग्रामपालिका उपसरपंचपदी असलेले इम्तियाज हसन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या या निवडीकरीता निवडणुक निर्णय अधिकारी तथा सरपंच रविंद्र निवृत्ती कोकाटे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी दिनकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपालिका सदस्यांची कार्यालयात निवडणुक सभा घेण्यात आली. त्यात या पदाकरीता संजय पंढरीनाथ थेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर सुचक म्हणुन इम्तियाज शेख यांनी सही केली दिलेल्या मुदतीत उपसरपंच पदारीता संजय थेटे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संजय थेटे यांची पालखेड ग्रामपालिका उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्यांनी घोषित केले. याप्रसंगी
ग्रामपालिका सरपंच रविंद्र निवृत्ती कोकाटे सदस्या पद्मावती भाऊसाहेब मेधने,जिजाबाई बाळकृष्ण आहेर,विठाबाई किसन पगार,कमल रतन आहेर,सुनंदाबाई रामकृष्ण पवार,अभिलाषा त्र्यबंकेश्वर पोटे,प्रमिला म्हसु पवार,राजेंद्र संतु चौधरी,इम्तियाज हसन शेख, बाबाजी एकनाथ गांगुर्डे आदिंसह निवृत्ती थेटे,ज्ञानेश्वर जाधव संजय शिंदे,संतोष आहेर,आनंदा पोटे, भाऊसाहेब थेटे,किसन पगार,भाऊसाहेब शिंदे,भाऊसाहेब मेधने,विलास थेटे,गणपत महाले,संभाजी थेटे,सतिष गुर्हाळे,विष्णु थेटे,शिवराज थेटे,सतिष थेटे,संजय थेटे,समाधान थेटे म्हसु पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संस्खेने उपस्थित होते.फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करीत या निवडीचा कार्यकत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार
सर्व गट-तट बाजुला ठेवत ग्रामपालिका उपसरपंचपदाची निवडणुक बिनविरोध करून गावासह परिसरात एकजुटीचा संदेश निर्माण करत माझ्यावर विश्वास ठेऊन सर्वसामान्य नागरीकाला उपसरपंचपदाची संधी दिली त्या विश्वासाला तडा न जाता गावात कामकाज केले जाईल.

संजय थेट:-नवनिर्वाचित उपसरपंच पालखेड ग्रामपालिका

Previous articleदेवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश आहेर व उपसभापती पदी अभिमन पवार यांची बिनविरोध
Next articleशासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकिय यंत्रणा दूत म्हणून देईल योगदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.