Home भंडारा अखेर अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पत्राची दखल

अखेर अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पत्राची दखल

117
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_062156.jpg

अखेर अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पत्राची दखल

अपंगांना कंत्राटी भरती मध्ये ४ टक्के आरक्षण

दिव्यांग विभाग उपसचिवाचे परिपत्रक निघाले

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) अपंगांना सरकारी क्षेत्रा बरोबरच कंत्राटी भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री यांना १ सप्टेंबर 2023 रोजी निवेदन पाठवण्यात आले होते .त्या निवेदनाची दखल घेऊन अखेर दिव्यांग विभागाचे उपसचिव वि .पु. घोडके यांनी परिपत्रक काढून दिव्यांगांना ४ टक्के सरकारी क्षेत्र बरोबरच कंत्राटी नोकर भरती मध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे .सरकारकडून एक दिवाळी भेट देण्यात आल्याने शासनाचे अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने केंद्र सरकारने दिव्यांग हक्क कायदा पारित करून दिव्यांग व्यक्तींना समान संधी व समान अधिकार दिलेले आहेत. या तरतुदीतील कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने दिव्यांगाना सरकारी नोकरीत 4% आरक्षण दिलेले आहेत .खाजगी कंत्राटी भारतीत सुद्धा आहे आरक्षण लागू राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग 2022/ प्र क्र ७९/दि क२ दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ला आदेश पारित केला असून त्या आदेशात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 33 प्रमाणे दिव्यांगासाठी सुयोग्य पदांची ओळख समुचित शासनाने करावी असे ठरविण्यात आले त्यात प्रामुख्याने नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीकडून भरती जाऊ शकतील अशी आस्थापनातील पदे नक्की करून कलम 34 मधील तरतुदीप्रमाणे राखीव ठेवावीत, अशी पदे नक्की करण्यासाठी लक्षणीय दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या प्रतिनिधीसह एक तज्ञ समिती स्थापित करण्यात यावी आणि नक्की केलेल्या पदांचा विशिष्ट काळाने निश्चितपणे आढावा घेण्यात यावा हा कालावधी तीन वर्षापेक्षा जास्त नसावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here