Home नांदेड नांदेड येथे आठवड्याभरात कार्यरत होणार जंबो कोविड सेंटर

नांदेड येथे आठवड्याभरात कार्यरत होणार जंबो कोविड सेंटर

170

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड येथे आठवड्याभरात कार्यरत होणार जंबो कोविड सेंटर

राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड येथे दोनशे खाटांचे तात्पुरत्या स्वरूपातील जंबो कोविड सेंटर उभारले जात असून, पुढील आठवड्याभरात ते कार्यरत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

आज नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली.
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड येथे अस्थायी जंबो कोविड सेंटर उभारले जाते आहे.
या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोना वरील आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध असतील.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन व रेमडेसिवीर सारख्या औषधांचा मागणी व पुरवठा आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी संपर्क साधून, नांदेड जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले.

जिल्ह्यात डॉक्टर व नर्सेसची कमतरता नसून, आवश्यक तिथे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी खासगी डॉक्टरांचीही सेवा घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देण्याचे निर्देशही या बैठकीत दिले.
त्यासंदर्भात आवश्यकता भासल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचनाही मी मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेची माहिती देऊन नांदेड जिल्ह्याला अधिक लसींचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्ह्याला अधिक प्रमाणात लसी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील. कोरोनावरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता नाही.
गरज भासेल तिथे शासनाकडून पुरेशी मदत मिळवून दिली जाईल.

कोरोनासंदर्भात शासनाने केलेले नियोजन व कोरोना उपचारांच्या सुविधेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांची मदत घ्यावी.

कोरोनावरील उपचारांच्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर कार्यरत करावा, असे निर्देश दिले. बाजारात सध्या हरभरा, गहू, मोठी ज्वारी आदी शेतीमालाची आवक सुरू असून, कोरोनाच्या आड भाव पाडले जाणार नाहीत याबाबत पुरेशी दक्षता घेण्याचे निर्देशही यावेळी दिले.

Previous articleभारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचा चा पीडित अनंत मौले यांना सहकार्याचा हात हे उपकार नव्हेत कर्तव्य आमचे
Next articleमनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.