Home माझं गाव माझं गा-हाणं भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचा चा पीडित अनंत मौले यांना सहकार्याचा हात...

भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचा चा पीडित अनंत मौले यांना सहकार्याचा हात हे उपकार नव्हेत कर्तव्य आमचे

94
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचा चा पीडित अनंत मौले यांना सहकार्याचा हात
हे उपकार नव्हेत कर्तव्य आमचे
ब्राम्हणगाव मोखाडा येथील पीडित अनंत मौले यांच्या घराला व दुकानाला काही दिवसांपूर्वी आग लागून त्यांच्या घरातील त्यांची आई ,पत्नी,मुलगा व मुलगी असे चार जण त्या आगीत दगावले व पूर्ण घर व दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
या भीषण परिस्थितीत अनंत मौले यांच्या मदतीला भारतीय जनता पार्टी धाऊन गेली व विधान परिषद चे विरोधी पक्ष नेते प्रविणजी दरेकर,आमदार मनिषाताई चौधरी व जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घेऊन दोन दिवसापूर्वी सदर ठिकाणी भेट दिली व अनंत मौले यांचे सांत्वन केले. भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे .पार्टी स्तरावर व शासन स्तरावर आम्ही आपणाला नव्याने उभे राहण्यासाठी पूर्ण मदत करू असे प्रविनजी दरेकर साहेब यांनी आश्वासन दिले.
त्या आश्वासनाची काही बाबींची पूर्तता करण्यासाठी आज आमदार मनीषा ताई चौधरी व जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पुन्हा सदर ठिकाणाला भेट देऊन पीडित अनंत मौले यांना घर उभे करण्यासाठी पाच ( 5 ) लाखाचा धनादेश दिला.तसेच या पुढे शासनस्तरावरून विशेष निधी प्राप्त होण्यासाठी पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.तसेच घर व व्यवसाय उभा करण्यासाठी या पुढेही ज्या निधीची आवश्यकता लागेल तो पार्टी देईल असा विश्वास अनंत मौले यांना दिला.
त्याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुरेखाताई थेतले,जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे,तालुका अध्यक्ष विठ्ठल चोथे,रघुवीर डींगोरे,मिलिंद झोले,विलास पाटील,राजेंद्र तुंबडे,पुंडलिक भानुशाली,संतोष भोई,दिलीप गाठे,उमेश येलमामे आदी पार्टीचे नेते मंडळी व मोखाडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(वैभव पाटील विभागीय संपादक ठाणे पालघर युवा मराठा न्युज नेटवर्क)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here