Home मुंबई कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी राहून गर्दी न...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी राहून गर्दी न करता साजरी करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

98
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी राहून गर्दी न करता साजरी करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

राजेश एन भांगे

 

मुंबई , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगात आनंद उत्साहात साजरी होतो.मात्र मागील वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू झाल्याने गेल्या वर्षी ज्या प्रमाणे साधेपणाने भीम जयंती साजरी झाली त्याच प्रमाणे यंदाही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता घरी राहून बुद्ध भीम प्रतिमा पूजन करून साजरी करावी असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
दि.१४ एप्रिलला चैत्यभूमी येथे गर्दी करण्या ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी यावेळी केले.

आज मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात येत्या १४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वा जयंती उत्सव साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी हे आवाहन केले.

यावेळी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, रिपाइं राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, मनपा चे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नागसेन कांबळे सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर; सामाजिक न्याय सह सचिव दिनेश डिंगळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत वर्षा पेक्षा या वर्षी कोरोना चे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत.
त्यामूळे यंदा भीम जयंती ला चैत्यभूमी येथे दर्शनासाठी गर्दी न करता घरी राहून, शासनाचे नियम पाळून, ऑनलाईन अभिवादन करून जयंती साजरी करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

कोविड- १९ विषाणू च्या प्रादुर्भावाच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबतचे शासनाने स्पष्ट नियमावली चे पत्रक काढावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना केली.

१४ एप्रिल पासून मुंबई मनपा ने कोविड च्या या काळात गरिबांना भोजनदान देण्याबाबत ही विचार करण्याची सूचना ना. रामदास आठवले यांनी केली.

दि. १४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ५ लोकांना परवानगी द्यावी अशीही सूचना ना. रामदास आठवले यांनी केली.

*चैत्यभूमी चे स्ट्रक्चरल ऑडिट करा*

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक येथील स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे.

चैत्यभूमी च्या पवित्र ऐतिहासिक स्तुपाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. जर कधी चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचे दुष्परिणाम मुंबई मनपाला राज्य शासनाला भोगावे लागतील असा ईशारा ना रामदास आठवले यांनी यावेळी दिला.
चैत्यभूमीचे लवकर ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी मनपा प्रशासनाला केली.

चैत्यभूमी च्या विकासासाठी निधी मनपा कडे उपलब्ध असताना स्तूपाची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला.
त्यावर चैत्यभूमी ही खाजगी जागेवर उभी असल्याने मनपा ला तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली.
त्यावर प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर सर्व आंबेडकर बंधू आणि संबंधितांच्या सहमतीने चैत्यभूमीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली.

येत्या दि. 14 एप्रिलला बांद्रा पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.

Previous articleवृत्तपत्र विक्रेत्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून घेतली कोविड-१९ लस 🛑
Next articleभारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचा चा पीडित अनंत मौले यांना सहकार्याचा हात हे उपकार नव्हेत कर्तव्य आमचे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here