Home नांदेड मुक्रमाबाद पोलिस ठाणे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सन्मान

मुक्रमाबाद पोलिस ठाणे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सन्मान

117

आशाताई बच्छाव

IMG_20240107_094612.jpg

मुक्रमाबाद पोलिस ठाणे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सन्मान

मुक्रमाबाद प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या कडून दि.६ रोजी येथील पत्रकार बांधवांचा लेखनी,डायरी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पोलिस ठाणे येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार यांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, जेष्ठ पत्रकार अशोक लोणीकर व गंगाधर चामलवाड यांच्या हस्ते पूजन करून बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पत्रकार लक्ष्मण कोळेकर, रज्जाक कुरेशी, संतोष हेसे, विनोद आपटे,जलील पठाण,मष्णा बाजगीरे,मझर पठाण, दादाराव गुमडे,शाकेर काजी, बस्वराज वंटगिरे, ज्ञानेश्वर राजुरे, काशीनाथ इंदुरे, विश्वनाथ अरन्य, अमोल गायकवाड, मुन्ना सुवर्णकार, आदी पत्रकारांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी केले तर शरीफ पठाण यांनी आभार मानले.

Previous articleम. रा. मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
Next articleजलसंपदाच्या पेपरफुटी प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस कंपनीची चौकशी करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.