Home वाशिम म. रा. मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240107_094133.jpg

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
हिरवा रंग प्रेमाचा तर भगवा रंग हा त्यागाचा प्रतिक – डॉ. शेख
वाशिम,(गोपाल तिवारी)- महाराष्ट्राच्या आधुनिक पत्रकारीतेचे अग्रदुत व जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई विदर्भ व वाशिम शाखेच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार शंकरराव हजारे, प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार ए.एस. शेख, अतिथी म्हणून मंचावर आयोजक तथा म.रा. पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सेामाणी, जेष्ठ पत्रकार विजयराव देशमुख, अभय खेडकर, माजी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विठ्ठल देशमुख आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हार्रापण करण्यात आले. सदर कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार नंदकिशोर वैद्य, अनिल वाल्ले, सुधाकर क्षिरसागर तसेच सामाजीक क्षेत्रात भरीव कार्य करणारे पत्रकार सासचे शाम सवाई, भारतीय जैन संघटनेचे प्रफुल्ल बानगावकर व जिल्हा नियेाजन समितीवर निवड झालेले पत्रकार हमीद शेख, कारंजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अध्यक्ष सुधीर देशपांडे व सचिव ज्ञानेश्वर घुडे यांचा शाल, श्रीफळ व भगवी टोपी, पेन, डायरी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. ए.एस. शेख यांनी हिरवा रंग हा प्रेमाचा तर भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे. रंग हे निसर्गाचे देण आहे. रंगावरुन राजकारण, भांडण, वादविवाद करु नका. पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचे कार्य करतो. समाजाला न्याय देणे, अन्यायाविरुध्द वाचा फोडणे, सर्वधर्मसमभाव ही भावना जनमानसात रुजविणे हे कार्य पत्रकारांचे आहे. प्रत्येकांनी आपले कर्तव्य समजून आपल्या जबाबदारीचे निष्ठेने पालन करावे असे आवाहन करत कुराण, बायबल, गिता समावेत वारकरी संप्रदाय याबाबत अतिशय मौलीक असे विस्तृत मार्गदर्शन करुन उपस्थितांना जिंकले. जेष्ठ पत्रकार विजयराव देशमुख यांनीही पत्रकारांनी संघटीत होणे काळाची गरज असल्याचे सांगुन आपसी मनभेद, मतभेद विसरुन पत्रकाराला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविकातून विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पत्रकाराला कोणतीही जात नसते. आपण कोणत्याही संघटनेत कार्य करीत असले तरी जेव्हा पत्रकारांवर संकटे येतात तेव्हा सर्वांनी एक व्हावे असे सांगत म.रा.मराठी पत्रकार संघ मुंबई ही पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असून राष्ट्रीय स्तरावर संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी सर्व उपस्थित पत्रकारांचा संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पेन, डायरी देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब देशमुख व विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माजी जिल्हाध्यक्ष पंकज गाडेकर, प्रास्ताविक निलेश सोमाणी तर आभार गजानन देशमुख यांनी मानले. पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाला जिल्हयातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भवन निर्माण कार्यास सर्वांच्या सहकार्याची गरज -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
Next articleमुक्रमाबाद पोलिस ठाणे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here