Home जालना जालन्यात खासगी बस पुलाखाली कोसळली; २५ प्रवाशी जखमी

जालन्यात खासगी बस पुलाखाली कोसळली; २५ प्रवाशी जखमी

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0052.jpg

जालन्यात खासगी बस पुलाखाली कोसळली; २५ प्रवाशी जखमी

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस थेट पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यातील ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ती बदनापूर येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घटना घडली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here