Home अमरावती पंकजा महाराष्ट्र भरलेल्या म्हणून कारवाई: बच्चू कडू यांची मुंडे वरील जीएसटी विभागाच्या...

पंकजा महाराष्ट्र भरलेल्या म्हणून कारवाई: बच्चू कडू यांची मुंडे वरील जीएसटी विभागाच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा; राजकारण तापले.

80
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230926-095803_WhatsApp.jpg

पंकजा महाराष्ट्र भरलेल्या म्हणून कारवाई: बच्चू कडू यांची मुंडे वरील जीएसटी विभागाच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा; राजकारण तापले.
—————————_–                      दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती संवाद यात्रा काढली. या यात्रेतर्गंत त्या महाराष्ट्रभर फिरल्या त्यामुळे त्यांच्या कारवाई झाली असेल असा सूचक शब्दात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुंडेवर झालेल्या जीएसटीच्या कारवाईच्या भाष्य केले आहे. याद्वारे त्यांनी एक प्रकारे भाजपवर शर संधान साध्य आहे. एसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्य वैद्यनाथ सहकार साखर कारखाने कार्यवाही केली. या अंतर्गत कारखान्याची जवळपास १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात असताना बच्चू कडू यांनी उपरोक्त विधान केले आहे. बच्चू कडू यांनी अमरावती पत्रकाराचे संवाद साधताना म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती संवाद यात्रा काढली. या यात्रेर्गत त्या स्वतः महाराष्ट्रभर फिरल्या यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. असेल असे वाटते परंतु पंकजा मुंडे वर काय कारवाई झाली? असा प्रश्न उपस्थित केला. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्र सरकारचा जीएसटी टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात या कारखान्यावर छापीमारी केली होती. त्यावेळी या कारखान्याने तब्बल १९ कोटी रुपयाचा जीएसटी बुडाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी जीएसटी विभागाने शनिवारी कारखान्याला नोटीस पाठवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी केंद्रीय जीएसटी आयुक्त कारखान्याची तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

Previous articleजालन्यात खासगी बस पुलाखाली कोसळली; २५ प्रवाशी जखमी
Next articleलोह्यात अवैध धंद्यांवर पोनी चिंचोलकर यांचा कारवाईचा धडाका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here