Home नांदेड लोह्यात अवैध धंद्यांवर पोनी चिंचोलकर यांचा कारवाईचा धडाका

लोह्यात अवैध धंद्यांवर पोनी चिंचोलकर यांचा कारवाईचा धडाका

156
0

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0064.jpg

लोह्यात अवैध धंद्यांवर पोनी चिंचोलकर यांचा कारवाईचा धडाका

जुगार अड्ड्यावर धाड ; दहा जणांवर गुन्हा दाखल तर १ लाख १४ हजार १७० रुपयाचा मुद्देमाल जप्त

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

नुकताच लोहा पोलीस स्टेशन येथे पोनी चिंचोलकर यांनी पदभार स्वीकारला आणि लोह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सत्र चालू केले आहे.

पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोहा येथे जुन्या न्यायालयाच्या परिसरामध्ये जुवा खेळत असणाऱ्या जुवाऱ्यांवर दि.२४ सप्टेंबर रोजी लोहा पोलीसाच्या पथकाने धाड टाकली असून सदर धाडीमध्ये एकूण दहा आरोपी जुगार खेळताना आढळुन आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर ठिकाणी जुगारासाठी वापरलेले पैसे, जुगार खेळण्याचे साहित्य,पत्ते,सहा मोबाईल,एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच सदरच्या धाडीमध्ये लोहा पोलिसांनी एकूण १,१४,१७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगार खेळतांना आढळून आल्या दाही आरोपीन विरोधात पोलीस स्टेशन लोहा येथे जुगार प्रतिबंध अधिनियम  कलम १२ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोनी चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी चन्ना, पीएसआय हालसे,सपोऊपनि सूर्यवंशी, केंद्रे, पोहवा किरपने, लाडेकर, पोका शेळके, इजुलकंठे, मेकलवाड, चालक मुळके, होमगार्ड कदम, क्षीरसागर यांनी केली आहे.

तर दि.२३ सप्टेंबर रोजी एका मटका अड्ड्यावर कारवाई करून लोहा पोलिसांनी मुंबई जुगार कायदा कलम १२ (a) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

Previous articleपंकजा महाराष्ट्र भरलेल्या म्हणून कारवाई: बच्चू कडू यांची मुंडे वरील जीएसटी विभागाच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा; राजकारण तापले.
Next articleबावनपैकी एकही “कुळ” नसलेला चंद्रशेखर बावनकुळे!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here