Home नांदेड सुनेगाव येथील बौद्ध स्मशानभूमी कायम करण्याच्या मागणीसाठी दि.२९ मे रोजी बौध्द समाज...

सुनेगाव येथील बौद्ध स्मशानभूमी कायम करण्याच्या मागणीसाठी दि.२९ मे रोजी बौध्द समाज बांधवांचे लोहा तहसिल कार्यालयासमोर उपोषण

255

आशाताई बच्छाव

Screenshot_20230527-213007_Google.jpg

सुनेगाव येथील बौद्ध स्मशानभूमी कायम करण्याच्या मागणीसाठी दि.२९ मे रोजी बौध्द समाज बांधवांचे लोहा तहसिल कार्यालयासमोर उपोषण
अंबादास पाटील पवार
लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव (कु.) येथील बौद्ध स्मशानभूमीची जागा कायम करण्याच्या मागणीसाठी सुनेगाव येथील बौद्ध बांधवांच्या वतीने दि. २९ मे रोजी लोहा तहसिल कार्यालयासमोर सा.उपोषणाला बसणार असल्याचे सूनेगाव येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने लोहा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
लोहा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, सुनेगाव येथील वडीलोपार्जित बौद्ध स्मशानभूमी कायम करावी, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर (आड) बुजून टाकला आहे तो रिकामा करावा या प्रमुख मागणीसाठी सुनेगाव येथील बौद्ध बांधवांच्या वतीने दि.२९ मे रोजी लोहा तहसिल कार्यालयासमोर सा. उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.
या निवेदनावर सार्वजनिक भीमजयंती मंडळ‌ व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleसावरकर जयंतीनिमित्त गीता उपासनी यांचे व्याख्यान
Next articleजनतेच्या विश्वासार्हतेला आम्ही प्राणपणे जपू – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.