Home मुंबई विधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षावर मुख्यमंत्री यांची जोरदार फटकेबाजी

विधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षावर मुख्यमंत्री यांची जोरदार फटकेबाजी

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0067.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: विधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षावर मुख्यमंत्री यांची जोरदार फटकेबाजी! विधिमंडळाच्या पायऱ्यावर चालू असलेल्या आंदोलनावरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री वरती टीका केली .त्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी सांगितले की जयंत पाटील यांना राष्ट्रीय प्रवक्ते होण्याची खूप घाई आहे व त्यांना विरोधी पक्षनेते पदावरती नेमणूक करावी मुख्यमंत्री हे सांगताना विसरले नाही.काही निर्णय आम्ही धाडसाने घेतले, आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहोत .बहुमत सिद्ध करून आम्ही येथे या ठिकाणी बसलोय. मी राज्याचा अडीच वर्षात खूप मोठा विकास करून दाखवेल असे त्यांनी सांगितले. आमच्या ५० लोकांकडे आमचे लक्ष आहे , तुमच्या लोकांकडे आमचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले आहे. काम करताना राग महत्त्वाचा नाही तर विकास महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले .आम्ही घेतलेले भूमिका ही जनतेने मान्य केलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार व विकास याबाबत फार गंभीर आहोत असे त्यांनी सांगितले .जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना कंत्राटी मुख्यमंत्री असे बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही विकासाचे कंत्राट घेतलेला आहे .बाळासाहेबांच्या विचाराचा त्याचबरोबर विकासाचे कंत्राट आम्ही घेतले आहे. होय मी महाराष्ट्राचा कंत्राटी मुख्यमंत्री आहे .महाराष्ट्र विकासाचे कंत्राट हाती घेतला आहे असे त्यांनी टोला लावला. शेतकऱ्यांना ५ हजारावरून १५ हजारापर्यंत मदत केली हे त्यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये लगेच कपात केली .माझ्याकडे टॅलेंट आहे .मी महाराष्ट्राचा अडीच वर्षात खूप काया पालट करू शकतो असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही पुढील ५ वर्षे सत्तेत राहणार हेही त्यांनी सांगितले. पाटील तुम्ही जे काय बोलतात ते अजित दादांना विचारता का हे सांगणे ते विसरले नाहीत. आम्ही महाराष्ट्राचा विकास भरभरून करणार असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here