Home पुणे महाराष्ट्रात पुण्यापासून मनसेची सभासद नोंदणीला सुरुवात!

महाराष्ट्रात पुण्यापासून मनसेची सभासद नोंदणीला सुरुवात!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0038.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्रात पुण्यापासून मनसेची सभासद नोंदणीला सुरुवात! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषित केले आहे की कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर मनसेचे सभासद नोंदणीला सुरुवात होणार आहे. इथून पाठीमागे सभासद नोंदणी होत असताना ती मुंबई येथून होत होती परंतु आता सभासद नोंदणी पुणे शहरापासून सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा राज ठाकरे यांनी स्वतःचाच सभासद नोंदणीचा फोटो जाहीर करून सभासद नोंदणीला सुरुवात केली आहे. त्यांनी या माध्यमातून माध्यमांना सांगितले आहे की महाराष्ट्रातल्या तरुण मित्रांनी, महिला व सर्वांनी या मोहिमेमध्ये हिंदूंचे रक्षण तसेच महाराष्ट्राची सेवा या योजनेत सहभागी व्हा, देशाला व महाराष्ट्राला बळकटी मिळण्यासाठी काम करा. त्यासाठी मनसेला सभासद नोंदणी मध्ये सहभाग घ्या. यावेळी नोंदी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले की नोंदणी झाल्यानंतर सर्व सभासदांना दर आठवडे मनसेचे कार्यक्रम त्याचबरोबर स्वतः राज ठाकरे यांचे भाषण, इथून पुढच्या काळामध्ये काय काय केले जाणार आहे, पक्षातर्फे याची माहिती दर आठवडी तुमच्या मोबाईल वरती मेसेज द्वारे तुम्हाला पोहोचली जाईल. अशा प्रकारे पुण्यामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदीला सुरू झाली आहे. पुण्यामध्ये स्वतः राज ठाकरे उपस्थित होते तर मुंबईमध्ये सभासद नोंदणीसाठी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या.

Previous articleविधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षावर मुख्यमंत्री यांची जोरदार फटकेबाजी
Next articleगडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here