Home पुणे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असल्यास संपर्क साधावा – आशिष शेळके.

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असल्यास संपर्क साधावा – आशिष शेळके.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0024.jpg

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असल्यास संपर्क साधावा – आशिष शेळके.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
किनवट : तालुक्यात सतत ६ दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे निरीक्षण केल्यानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झालेल्या चे निरीक्षणास आले.
आशिष शेळके यांनी सांगितले की, गोकुंदा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ मध्ये व वार्ड क्रमांक ३ मध्ये काही घरे पडली तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत, तर वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये सुद्धा काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. त्या घरांची पाहणी केल्यानंतर मी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मावळे यांना यांबाबत माहिती दिली व तेथील पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर सहकार्य करावे असे सांगितले. ग्रामसेवक मावळे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर सहकार्य करु अशे आश्र्वासन दिले.
पुढे बोलताना शेळके म्हणाले की, गोकुंदा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ ते वार्ड क्रमांक ६ मधील कुठल्या नागरीकांच्या घराची पडझड झाली असेल, किंवा एखादी भिंत ढासळुन घराचे काही नुकसान झाले असेल, तर त्यांनी तातडीने ज्यांच्या नावा वर घर आहे त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व नमुना नंबर ८ यांचे झेरॉक्स प्रत आणि नुकसान झालेल्या घराचा फोटो हे गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये जमा करावे, नुकसान झालेल्यांना ग्रामपंचायत मधुन अर्थिक सहकार्य मिळेल, जर ग्रामपंचायत मधुन सहकार्य मिळत नसेल तर त्या नागरिकांनी मला माझ्या ९७६३१२९७९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आशिष शेळके यांनी सांगितले.

Previous articleजागतिक युवा कौशल्य दिन” दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन
Next articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या – प्रहार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here