• Home
  • अजितदादांकडून पवारसाहेबांन समोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक !..🛑 ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पुणे :⭕ रोखठोक

अजितदादांकडून पवारसाहेबांन समोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक !..🛑 ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पुणे :⭕ रोखठोक

🛑 अजितदादांकडून पवारसाहेबांन समोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक !..🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ रोखठोक स्वभाव, अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे चूक झालेल्याचा जागेवरच पाणउतरा करतात. तसेच, एखाद्याच्या चांगल्या कामाचे जाहीर कौतुकही करतात. त्याची प्रचिती आज पुणेकरांना आली. कारण, अजितदादांनी आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे तोंड भरून कौतुक केले. तेही खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर. विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतानाही अजितदादांनी केलेल्या या कौतुकाची चर्चा होत आहे.
पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. शहरातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.
या वेळी अजितदादांनी महापौरांचे कौतुक करत असताना अधिकाऱ्यांना मात्र कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले की, मी रोज सकाळी सात वाजता चार अधिकरयांना फोन करतो आणि आढावा घेतो. मग महापालिका आयुक्त, आणि जिल्हाधिकारयांनीही रोज आमदार, खासदारांना फोन कराच. मी अधिकरायांना फोन करतो; तेव्हा तुमही लोकप्रतिनिधींना करायलाच हवा. मला यापुढे तक्रार नको. एकत्र काम करा…⭕

anews Banner

Leave A Comment