• Home
  • मंत्री,खासदार,आमदारांनी कांदा प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा त्यांच्या दारात कांदे ओतू ! प्रतिनिधी = किरण अहिरराव

मंत्री,खासदार,आमदारांनी कांदा प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा त्यांच्या दारात कांदे ओतू ! प्रतिनिधी = किरण अहिरराव

मंत्री,खासदार,आमदारांनी कांदा प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा त्यांच्या दारात कांदे ओतू !

प्रतिनिधी = किरण अहिरराव

लासलगाव l आधी निर्यातबंदी हटवण्यासाठी केलेली दिरंगाई व नंतर कोरोणाच्या महामारी मुळे सततच्या लाॅकडाऊन मुळे राज्यातील कांदा विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठे आर्थिक नुकसान झाले असून केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे राज्यातील कांदा उत्पादकांचा कांदा थेट 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा या मागणीसाठी केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील मंत्री त्या-त्या जिल्ह्यातील खासदार व आमदार यांनी कांदा दर घसरलेल्या या परिस्थितीतून कांदा उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारकडे जोरदार मागणी करावी केंद्र व राज्य सरकारला महाराष्ट्रातील कांदा थेट 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करायला भाग पाडावे अन्यथा 10 जुलै 2020 पासून मंत्री खासदार आमदार यांच्या दारात कांदे ओतून आंदोलन केले जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

मागील वर्षी अखेरीस कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने विदेशातून महागडा कांदा आयात करून व कांद्याची निर्यातबंदी करून कांद्याचे बाजार भाव पाडण्याचे काम केले होते.त्यावेळेस कांद्याचे दर जरी वाढलेले दिसत होते तरी अतिवृष्टीने कांद्याचे नुकसान झाल्याने प्रतीएकरी अगदी पाच ते दहा क्विंटल कांदा निघत असल्याने या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना थेट उत्पन्नाच्या माध्यमातून मिळालेला नव्हता त्यातच कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी दिरंगाई केल्याने कांद्याचे बाजार भाव सातत्याने घसरण होत राहिली 2 मार्च 2020 रोजी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची अधिसूचना काढल्यानंतर प्रत्यक्ष निर्यात सुरू करण्याची प्रक्रिया 15 मार्च 2020 पासून सुरू होणार असा निर्णय घेण्यात आला होता

anews Banner

Leave A Comment